कठुआ (जम्मु कश्मीर) - जम्मु कश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात शनिवारी बॅरेकची भिंत कोसळुन दोन जवानांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
शुक्रवारी संध्याकाळी बिल्लावर येथील मच्छेडी कॅम्पमधील बॅरेकची भिंत कोसळली. या भिंतीखाली तीन जण अडकले होते. त्यानंतर तातडीने बचावकार्य सुरु करुन तिघांना बाहेर काढण्यात आले. त्यांना सिविल हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्यावेळी ते गंभीर जखमी अवस्थेत होते.
दोघांचा मृत्यू तर एक जखमी
तिघांपैकी दोन जणांना मृत घोषित केले. यात हरियाणामधील सोनिपेटचे जेसीओ एल सिंग आणि जम्मु कश्मीरमधील सांबाचे नाईक परवेझ कुमार या दोघांचा समावेश आहे. तर पानिपतमधील जवान मंगल सिंग हे गंभीर जखमी असून त्यांना पठाणकोटमधील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या स्पेशल ट्रीटमेंट करण्यात येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा - शेतकरी आंदोलन : आणखी एकाचा मृत्यू; आतापर्यंत ३४ शेतकऱ्यांनी गमावले जीव