पुलवामा - जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील बंदजू परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय सैन्याला यश आले. एक जवानाला या चकमकीत वीरमरण आले आहे. दरम्यान, या परिसरात शोधमोहिम सुरू आहे.
'ईटीव्ही भारत'ला मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दल, पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तपणे शोधमोहिम सुरू केली होती. जेव्हा जवानांनी संशयित परिसराला वेढा घातला. तेव्हा दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. यावर जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर एक जवानाला या चकमकीत वीरमरण आले आहे.
दरम्यान, याआधी सोमवारी पुलवामामधील त्राल सेक्टरच्या बाटगुंडमध्ये सीआरपीएफ कँपच्या परिसरात गोळीबारासह ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात अज्ञात आरोपीने ढोक डिफेंन्स कमिटीचे सदस्य गोपालनाथ यांना गोळी मारली होती.
सुरक्षा दलाच्या कारवाईमुळे दहशतवाद्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याआधी सोमवारी दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात वेरीनाग जंगलमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्या चकमक झाली. जवानांना जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर जवानांनी शोध मोहिम होती घेत ही कारवाई केली होती. २० जून रोजी कुलगाम जिल्ह्यात झालेल्या इन्काऊंटरमध्ये जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले होते.
हेही वाचा - हुतात्मा कर्नल संतोष बाबूंच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी दिला मदतीचा धनादेश...
हेही वाचा - अक्साई चीनवरचा हक्क सोडा आणि तडजोड करा; सुधींद्र कुलकर्णींचा पंतप्रधान मोदींना सल्ला