श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या डोडा आणि किश्तवाड परिसरात दहशवादी कारवाईत सहभागी असलेल्या, लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला पकडण्यात भारतीय लष्कर आणि काश्मीर पोलिसांना यश आले आहे. जमालउद्दीन गुज्जर उर्फ अबू बकर असे पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे.
-
Joint operations team captures LeT terrorist alive in Doda
— ANI Digital (@ani_digital) July 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/ie5ISkKRdQ pic.twitter.com/aLHcCpb9xD
">Joint operations team captures LeT terrorist alive in Doda
— ANI Digital (@ani_digital) July 24, 2019
Read @ANI Story | https://t.co/ie5ISkKRdQ pic.twitter.com/aLHcCpb9xDJoint operations team captures LeT terrorist alive in Doda
— ANI Digital (@ani_digital) July 24, 2019
Read @ANI Story | https://t.co/ie5ISkKRdQ pic.twitter.com/aLHcCpb9xD
मागील काही दिवसांपूर्वी डोडा आणि किश्तवाड जिल्ह्यात नेत्यांची हत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये गुज्जर असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी या कारवाईत दहशतवादीकडून एक एके-47 बंदूक आणि गोळ्यांनी मॅक्झीनही जप्त केली आहे.
गुज्जर हा किश्तवाड जिल्ह्यातील रहिवाशी आहे. 22 जून रोजी किश्तवाडमधील सरवाना जंगलात भारतीय सैन्यासोबत झालेल्या गोळीबारीत तो जखमी झाला होता. जखमी अवस्थेत तो जंगलात लपला होता. विशेष बाब म्हणजे, गुज्जरला पकडण्यासाठी पाच लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते.