ETV Bharat / bharat

जयपूर फूट : अभियांत्रिकी गांधीवादाचे उत्तम उदाहरण

या लेखामध्ये, भारतातील नावाजलेल्या वैज्ञानिकांपैकी एक, डॉ. रघुनाथ माशेलकर हे अभियांत्रिकी गांधीवादाबद्दल बोलत आहेत. त्च्यांच्या मते, 'जयपूर फूट' हे अभियांत्रिकी गांधीवादाचे उत्तम उदाहरण आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जेव्हा गांधींजींची १५०वी जयंती साजरी करण्याचे ठरवले, तेव्हा त्यात 'मानवतेसाठी भारत' या उपक्रमाअंतर्गत, देशाचे नाव उंचावलेल्या 'जयपूर फूट'ची निवड केली होती.

जयपुर फूट
author img

By

Published : Aug 27, 2019, 6:27 AM IST

जयपूर - भारतातील नावाजलेल्या वैज्ञानिकांपैकी एक, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या मते, 'जयपुर फूट' हे अभियांत्रिकी गांधीवादाचे उत्तम उदाहरण आहे. जयपुर फूट या भारतीय बनावटीच्या कृत्रीम पायाचा आजवर जगभरातील जवळपास १८ लाख लोकांना फायदा झाला आहे. "थोड्यातून अधिक" या गांधीवादी सिद्धांताचे उत्तम उदाहरण म्हणजे जयपूर फूट.

जयपूर फूट हा किंमतीला कमी मात्र तांत्रिकदृष्ट्या कमालीचा आहे. या कृत्रीम अवयवाची किंमत केवळ ४,१०० रुपये आहे. 'भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती'ने या कृत्रिम अवयवाची निर्मिती केली आहे. ज्यामुळे दिव्यांगांना अभिमानाने चालता येऊ शकते.

'भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती'चे संस्थापक, देवेंद्र राज मेहता हे एक प्रशासकीय अधिकारी होते. अथक मेहनतीच्या जोरावर ते आधी रिजर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर, आणि नंतर भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळाचे संस्थापक अध्यक्ष झाले. त्यांचे कुटुंब गांधीवादी होते. त्यामुळेच त्यांनी, आपल्या शरीराचे अंग गमावलेल्या लोकांच्या सेवेसाठी भगवान महावीर विकलांग सहाय्यता समितीची स्थापना केली.

मेहता म्हणतात, गांधीवादाचा एक भाग हा सेवा आहे. या शिकवणीमुळे, विकलांगांच्या सेवेसाठी ४४ वर्षांपूर्वी मी या संस्थेची स्थापना केली. या संस्थेमधील लोक इतरांच्या वेदना समजू शकतात. दुसऱ्यांच्या मदतीने इथे आलेली व्यक्ती, परत जाताना मात्र स्वतःच्या पायावर चालत जाते तेव्हा ती स्वतःसोबत फक्त चालण्याचे साधन नाही, तर बराच आत्मविश्वास देखील घेऊन जाते. आम्ही गांधीवादाला फक्त कागदावर न ठेवता कृतीमध्ये आणतो.

मेहता यांनी आईनस्टाईन यांच्याबद्दल प्रचंड वाचन केले आहे. त्यांच्या मते गांधी हे भारताने जगाला दिलेले विसाव्या शतकातील सर्वोच्च भेट आहेत. अभियांत्रिकी गांधीवादाच्या जोरावरच २१व्या शतकात भारत जगाचे नेतृत्व करु शकेल.
अभियांत्रिकी गांधीवाद हा नवीन शोध सामान्यांना फक्त परवडणारे नाही, तर अत्यंत परवडणारे असावेत यावर भर देतो. 'कमी गोष्टींमधून अधिक लोकांसाठी अधिक फायदा' हे साध्य करण्यासाठी, नवीन शोध किंवा उपक्रम तयार करण्याच्या प्रक्रियेत अधिकाधिक लोकांना सामिल करून घेणे आवश्यक आहे. यामुळेच, नवनिर्मितीनंतर, आपण त्यातून किती फायदा मिळवला याऐवजी, लोकांना त्यातून किती फायदा आणि आनंद मिळाला हे आपण पाहू शकतो.

जयपूर फूट हा असाच एक स्थानिक शोध आहे, जो कमीत कमी आर्थिक संसाधनांमधून जास्तीत जास्त फायदा मिळवून देतो. स्व. मास्टर रामचंद्र या कुशल कारागीराने सर्वप्रथम कृत्रीम पायाची संकल्पना मांडली. त्यानंतर १९६८ मध्ये तीन डॉक्टरांच्या मदतीने, त्यांनी जगासमोर पहिला जयपुर फूट सादर केला. १९६८ मध्ये याची किंमत २५० रूपये होती. त्यानंतर ४४ वर्षांनतर आज याची किंमत केवळ ४,१०० रूपये आहे. परदेशात इतर तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेल्या अशाच कृत्रीम अवयवाची किंमत तब्बल दहा हजार डॉलर्स पेक्षा जास्त आहे. मात्र, या तुलनेत जयपुर फूट केवळ ६६ डॉलर्स एवढ्या किंमतीला मिळतो.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जेव्हा गांधींजींची १५०वी जयंती साजरी करण्याचे ठरवले, तेव्हा त्यात 'मानवतेसाठी भारत' या उपक्रमाअंतर्गत, देशाचे नाव उंचावलेल्या 'जयपुर फूट'ची निवड केली होती. या उपक्रमामध्ये, एका वर्षासाठी जगभरात कृत्रीम अवयवांच्या प्रत्यारोपणाची शिबिरे घेण्यात आली. परराष्ट्र मंत्रालय आणि 'भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती' यांच्या संयुक्त विद्यमाने ही शिबिरे घेण्यात आली.

गतवर्षी सुरू करण्यात आलेल्या "मानवतेसाठी भारत" या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी, भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री, स्व. सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या, की हा उपक्रम जगभरातील हजारो गरजू लोकांना मदत करेल. याचे उद्दिष्ट हे जगभरातील दिव्यांगांचे शारिरीक, आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करून, त्यांना स्वावलंबी बनवून, त्यांचा आत्मसन्मान परत मिळवून देणे आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.