नवी दिल्ली - भारताच्या इंडो तिबेटीयन सीमा पोलिसांनी (आयटीबीपी) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. आयटीबीपी जवानांनी हिमाचलमधील लियो पारगील शिखर सर केले आहे. लियो पारगील शिखराची उंची 22 हजार 222 फूट आहे. शिमलामधील सेक्टर हेड क्वॉर्टर आईटीबीपीच्या 16 जणांच्या गटातील 12 सदस्यांनी शिखरावर यशस्वी चढाई करत तिरंगा फडकावला. कोरोना काळात शिखर सर करणारा हा पहिला गट ठरला आहे.
डेप्युटी कमांडर कुलदीप सिंग हे गटाचे लिडर होते. तर डेप्युटी कमांडर धर्मेंद्र हे डेप्युटी लिडर होते. तसेच हेड कॉन्स्टेबल प्रदीप नेगी यांचा ही या गटात समावेश होता. प्रदीप नेगी यांनी यापूर्वी जगातील सर्वात उंच असलेले माउंट एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई केली आहे.
लियो पारगील शिखराची चढाई करण्यापूर्वी सर्वांना योग्य प्रशिक्षण घेतले होते. तसेच त्यांनी कोरोना संकटात येणाऱ्या मर्यादाचेही निरक्षण केले होते. दरम्यान, लियो पारगील शिखर हे देशातील उंच शिखरापैकी एक आहे. हिमाचलमधील लाहौल स्पीति जिल्ह्यात हे शिखर आहे.