नवी दिल्ली - भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) देशाच्या महत्वकांक्षी चांद्रयान-२ च्या उड्डाणाची पूर्व चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. भारत पुन्हा एकदा इतिहास घडविण्यासाठी सज्ज झाला आहे. सोमवारी २२ जुलैला चंद्रयान - २ चे उड्डाण होणार आहे.
यासंदर्भात 'जीएसएलव्हीएमके३ - एम१ (GSLV MK3-M1) / चांद्रयान-२ च्या उड्डाणाची रिहर्सल पूर्ण,' असे ट्विट इस्रोने केले आहे.
-
Launch rehearsal of #GSLVMkIII-M1 / #Chandrayaan2 mission completed, performance normal#ISRO
— ISRO (@isro) July 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Launch rehearsal of #GSLVMkIII-M1 / #Chandrayaan2 mission completed, performance normal#ISRO
— ISRO (@isro) July 20, 2019Launch rehearsal of #GSLVMkIII-M1 / #Chandrayaan2 mission completed, performance normal#ISRO
— ISRO (@isro) July 20, 2019
यापूर्वी १५ जुलैला चांद्रयान-2 हे चंद्राच्या दिशेने झेपावणार होते. मात्र, अखेरच्या क्षणी रॉकेटमध्ये काही तांत्रिक बिघाड उद्भवल्याने इस्त्रोने हे उड्डाण रद्द केले होते.
चांद्रयान - 2 हे भारतीय तंत्रज्ञान आहे. हे चंद्रावरील, अशा भागांचा शोध घेईल जेथे अद्याप कुणीही पाय ठेवलेला नाही. जीएसएलव्हीएमके३ - एम१ या प्रक्षेपक यानाच्या साहाय्याने चांद्रयान-२ चे ऑर्बिटर आणि लँडर पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावतील आणि नंतर चंद्राच्या कक्षेत सोडण्यात येतील. या निमित्ताने भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा जगातील पहिलाच देश ठरणार आहे. चांद्रयान-१ च्या यशानंतर अवघ्या दहाच वर्षांत 'इस्रो' चांद्रयान-२' च्या निमित्ताने दुसऱ्यांदा चंद्रावर पाऊल ठेवणार आहे.