नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्याचे खासगीकरण करण्याच्या केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. यातच इस्त्रोचेही खाजगीकरण करण्यात येणार अशा चर्चा सुरू होत्या. मात्र, या चर्चांचे इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी आज खंडन केले. इस्त्रोचे खासगीकरण करण्यात येणार नाही. आतापर्यंत ज्या प्रकारे इस्रो कार्य करत आली आहे. त्याच प्रकारे यापुढेही कार्यरत राहील, असे आज इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी स्पष्ट केले. इस्त्रोने आयोजित केलेल्या एका वेबीनारमध्ये ते बोलत होते.
इस्त्रोचे खासगीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. भारताच्या अंतराळविषयक कार्यक्रमांमध्ये खाजगी कंपन्यांना उत्पादन आणि क्षमता वाढवण्यासाठी इस्रोच्या सुविधांचा लाभ दिला जाईल. इस्त्रोचा नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर आहे, असे इस्त्रोचे विज्ञान सचिव, श्री आर. उमामहेश्वरण म्हणाले.