ETV Bharat / bharat

आयएनएक्स मीडिया प्रकरण : चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ

author img

By

Published : Nov 13, 2019, 5:23 PM IST

दिल्लीतील रोज अ‌ॅव्हेन्यू न्यायालयाने पी. चिदंबरम यांची न्यायालयीन कोठडी २७ नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे चिदंबरम यांना हा महिनाही तुरुंगातच काढावा लागणार आहे. न्यायालयीन कोठडीत वारंवार वाढ होत असल्यामुळे चिदंबरम यांना यावर्षी दिवाळी तुरुंगातच साजरी करावी लागली होती.

INX Media case Rouse Avenue Court extends the judicial custody of P Chidambram till 27th November

नवी दिल्ली - भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. आज त्यांच्या न्यायालयीन कोठडीचा शेवटचा दिवस होता. मात्र, दिल्ली न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये पुन्हा वाढ केली आहे.

दिल्लीतील रोज अ‌ॅव्हेन्यू न्यायालयाने पी. चिदंबरम यांची न्यायालयीन कोठडी २७ नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे चिदंबरम यांना हा महिनाही तुरुंगातच काढावा लागणार आहे. न्यायालयीन कोठडीत वारंवार वाढ होत असल्यामुळे चिदंबरम यांना यावर्षी दिवाळी तुरुंगातच साजरी करावी लागली होती. पी. चिदंबरम आयएनएक्स माध्यम गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना २१ ऑगस्टला अटक करण्यात आली होती. सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रीन प्रतिबंध कायद्याअंतर्गत त्यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. 'फॉरेन इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्डा'मध्ये झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

Intro:Body:

आयएनएक्स मीडिया प्रकरण : चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ

नवी दिल्ली - भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. आज त्यांच्या न्यायालयीन कोठडीचा शेवटचा दिवस होता. मात्र, दिल्ली न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये पुन्हा वाढ केली आहे.

दिल्लीतील रोज अॅव्हेन्यू न्यायालयाने पी. चिदंबरम यांची न्यायालयीन कोठडी २७ नोव्हेंबर पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे चिदंबरम यांना हा महिनाही तुरुंगातच काढावा लागणार आहे. न्यायालयीन कोठडीत वारंवार वाढ होत असल्यामुळे चिदंबरम यांना यावर्षी दिवाळी तुरुंगातच साजरी करावी लागली होती.

पी. चिदंबरम आयएनएक्स माध्यम गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. २१ ऑगस्टला अटक करण्यात आली होती. सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रीन प्रतिबंध कायद्याअंतर्गत त्यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. 'फॉरेन इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्डा'मध्ये झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.