नवी दिल्ली - स्वच्छ हवा सर्वांचा अधिकार आहे. स्वच्छ हवेअभावी जगभरात दरवर्षी लाखो लोकांचे मृत्यू होता. विविध आजार जडतात. यासंबंधी इशारा देणारे अनेक अहवालही प्रकाशित झाले आहेत. मात्र, पाहिजे तेवढी जनजागृती झालेली नाही. संयुक्त राष्ट्राच्या ७४ व्या आमसभेने डिसेंबर २०१९ मध्ये ७ सप्टेंबर हा 'क्लिन एअर फॉर ब्लू स्काय' जाहीर केला. निळं आकाश, स्वच्छ हवा सर्वांना मिळावी ही भावना यामागे आहे.
हवा प्रदुषण कमी करण्यासाठी, त्याला आळा घालण्यासठी ७ सप्टेंबर हा दिन जगभरात या वर्षीपासून साजरा केला जातोय. यावर्षी संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट आहे. मात्र, तरीही ऑनलाईन, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, व्हर्च्युअल माध्यमातून कार्यक्रम घेत जनजागृती करण्यात येतेय.
हवा प्रदुषण मानवी आरोग्याला सर्वात घातक..
हवा प्रदुषण मानवी आरोग्याला सर्वात जास्त घातक आहे. २०१६ साली जागतिक स्तरावर हवा प्रदुषणामुळे सुमारे ६५ लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मुख्यता विकसनशील देशांमध्ये हवा प्रदुषणाचा धोका जास्त आहे. कमी उत्पन्न गटातील महिला, बालके आणि वृद्ध व्यक्ती हवा प्रदुषणाचे सर्वात जास्त बळी ठरतात. विकसनशील देशामध्ये इंधन म्हणून लाकूड वापरले जाते. घरात स्वयंपाकासाठी चूलीमुळे होणाऱ्या धुरांमुळे महिलांचे आरोग्य धोक्यात येते. या सोबतच केरोसिनचाही वापर मोठ्या प्रमाणात होतो.
हवा प्रदुषणामुळे भारतीयांचे जीवनमान सुमारे ५ वर्षांनी खालावले
भारतात हवा प्रदुषणाचे गंभीर परिणाम दिसून आले आहेत. देशातील नागरिकांचे सरासरी जीवनमान पाच वर्षांनी कमी झाले आहे. शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्युटनुसार उत्तर भारतातील गंगा नदीच्या पट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांचे जीवनमान प्रामुख्याने खालावले आहे. मात्र, २०१६ ते २०१८ या अवधीत जीवनमानात सुधारणा झाल्याचेही विद्यापीठाने म्हटले आहे.
जगात भारत पाचव्या क्रमांकाचा प्रदुषित देश - अहवाल
एका अहवालानुसार २०१९ साली भारत हा जगात पाचव्या क्रमांकाचा प्रदुषित देश होता. दिल्ली राजधानी क्षेत्रातील गाझीयाबाद हे सर्वात जास्त प्रदुषित शहर असल्याचे समोर आले होते. IQAir या कंपनीने देशातली प्रदुषणाचा अहवाल तयार केला होता. त्यानुसार ही माहीत समोर आली आहे.
२०२० च्या आकडेवारी नुसार जगातील सर्वात जास्त प्रदुषित देश
१) बांगलादेश
२) पाकिस्तान
३) मंगोलिया
४) अफगाणिस्तान
५) भारत
कोरोनामुळे जगभरात प्रदुषण झालं होत कमी
मार्च ते एप्रिल महिन्यात जगभरातील अनेक देशांनी टाळेबंदी जाहीर केली होती. उद्योगधंदे, व्यापार वाहतूक बंद असल्याने अनेक शहरातील हवेची गुणवत्ता सुधारली होती. राजधानी दिल्ली जेथे, हवेचा स्तर मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात खालावला आहे. तेथेही लॉकडाऊन काळात हवेची स्थिती सुधारली होती. भारतामध्ये २०१८ साली सुमारे १२ लाख नागरिकांचा जीव गेल्याचे अहवालातून समोर आले आहे. यासंबंधी नागरिकांना विचारले असता, १० पैकी ९ जणांनी त्यांच्या परिसरात हवेची स्थिती चागंली असावी, अशी आशा व्यक्त केली. लॉकडाऊन काळात चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबई या महत्वांच्या पाच शहरांचे प्रदुषण घटले