ETV Bharat / bharat

जगातील सर्वात जुने 'आयएनएस विराट' इतिहासजमा - आयएनएस विराट

जगातील सर्वात जुने व भारतातील सर्वात मोठे विमानवाहू जहाज 'आयएनएस विराट' आज इतिहासजमा झाले. भावनगर जिल्ह्यातील अलंग समुद्रकिनाऱ्यावर त्याचे तोडकाम करण्यात आले.

आयएनएस विराट
आयएनएस विराट
author img

By

Published : Sep 28, 2020, 7:49 PM IST

नवी दिल्ली - जगातील सर्वात जुने व भारतातील सर्वात मोठे विमानवाहू जहाज 'आयएनएस विराट' मार्च 2017ला भारतीय नौदलातून सेवानिवृत्त झाले होते. भावनगर जिल्ह्यातील अलंग समुद्रकिनाऱ्यावर त्याचे तोडकाम करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. गुजरातमधील अलंगमध्ये श्रीराम ग्रुप हा जहाज तोडणीचा प्रकल्प आहे.

आयएनएस विराट या विमानवाहू जहाजाने 30 वर्षे नौदलात महत्त्वपूर्ण कामगिरी बजाविली आहे. सर्वात जुनी युद्धनौका अशी आयएनएस विराटची ओळख आहे. आयएनएस विराटचा नौदलात 1987मध्ये समावेश करण्यात आला. श्रीराम ग्रुपने मेटल स्क्रॅप ट्रेडच्या लिलावातून आयएनएस विराट ही 38.54 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. कारगिल युद्धावेळी पाकिस्तानच्या कराची बंदरातून युद्धनौका बाहेर पडू नये, यासाठी शत्रूवर वचक ठेवण्याची कामगिरी या जहाजाने केली होती.

आयएनएस विराट ही भंगारात काढण्याचा निर्णय भारतीय नौदलाशी चर्चा करून घेण्यात आल्याचे केंद्र सरकारने गेल्या वर्षी संसदेत सांगितले होते. आयएनएस विराट ही भारतीय नौदलाने 65 दशलक्ष डॉलरला खरेदी केली होती. यापूर्वी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतदेखील 2014 मध्ये भंगारात काढण्यात आली आहे. या युद्धनौकेचे वस्तुसंग्रहालयात रुपांतरण करावे, अशी नागरिकांनी मागणी केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.