चंदीगड - कोरोनाबाबत सोशल मीडियावर विविध अफवा परविण्यात येत आहे. काळजी घेण्यासाठीही विविध पद्धती सांगितल्या जात आहेत. भाजीपाल्याला साबण-पाण्याने धुवा मगच त्याचे सेवन करा, अशाही पोस्ट व्हायरल होत आहेत. पण, हे आपल्या आरोग्यास ठिक आहे का.? याबाबत पंचकूला येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जसजीत कौर यांच्याशी बातचीत केली.
डॉक्टर्सचा सल्ला
डॉ. जसजीत कौर म्हणाल्या, साबण जर आपल्या शरिरात गेला त्याचे मोठे नुकसान आहे. भाजीपाला पाण्याने स्वच्छ धुणे गरजेचे आहे. तसेच जे काही वस्तू बाहेरून आणतो ते सर्व स्वच्छ धुणे गरजेचे आहे.
⦁ स्टीलच्या वस्तुंवर कोरोना दोन दिवसांपर्यंत टिकतो. सार्वजिनिक वाहनांमध्ये स्टीलचा वापर असतो. त्यामुळे सीटी बस, स्टील असलेल्या वाहनांच्या भागांना स्पर्श करु नये, असा सल्लाही दिला.
⦁ काच किंवा लाकडी वस्तूंवर चार दिवसांपर्यंत कोरोना जिवंत राहू शकतो. त्यामुळे घराबाहेर कोणत्याही काचेच्या आणि लाकडाच्या वस्तूंना हात लावू नये.
⦁ या व्यतिरिक्त रबर किंवा रबराने तयार झालेल्या वस्तूंवर हा विषाणू कमीत कमी 8 तास जिवंत राहतो.
हेही वाचा - माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुलांनी केले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक