इंदूर - जागतिक योग दिनाच्या निमित्ताने, इंदूरमध्ये १० हजाराहून अधिक लोकांनी ऑनलाईन योगा करत विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. इंदूरमध्ये आज बाबा रामदेव यांच्या ऑनलाईन योगा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नागरिकांना सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्यास सांगण्यात आले. तेव्हा तब्बल १० हजाराहून अधिक लोकांनी नोंदणी केली. यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडलेले गेलेल्या १० हजाराहून अधिक लोकांनी योगा केला. हा एक विश्वविक्रम ठरला आहे.
ऑनलाईन योगा सत्रामध्ये बाबा रामदेव यांनी इंदूर शहरवासियांना योगा संदर्भात टिप्स दिल्या. यासोबत त्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवावी, यासंदर्भात मार्गदर्शन केले. हा संपूर्ण कार्यक्रम फेसबुक, ट्विटर आणि झूम या सारख्या सोशल मीडिया माध्यमातून पार पडला. यात १० हजाराहून अधिक लोकांनी आपला ऑनलाईन सहभाग नोंदवला. आता हा एक विश्वविक्रम बनला आहे. कार्यक्रम संपल्यानंतर वर्ल्ड बुक ऑफ रेकार्डसने प्रमाणपत्र देत हा विश्वविक्रम ठरल्याचे जाहीर केले. दरम्यान, या कार्यक्रमाची माहिती वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डला पहिली देण्यात आली होती.
बाबा रामदेव यांच्या ऑनलाईन योगा सत्रात इंदूरचे खासदार शंकर ललवानी हे देखील जोडले गेले होते. याशिवाय विविध सामाजिक संघटनानीही आपला सहभाग नोंदवला. दरम्यान, या कार्यक्रमाला मिळालेल्या प्रतिसाद पाहून भारावलेले बाबा रामदेव यांनी इंदूर शहरात प्रत्येक पक्षातील आणि प्रत्येक समाजातील नागरिक योगा करत असल्याचे सांगितले.
दरम्यान, संपूर्ण जगात कोरोना विषाणूने हाहाकरा माजवला आहे. यामुळे लाखो लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. अशात कोरोनावर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध होईपर्यंत आपली शारीरिक स्थिती सुदृढ ठेवणे, प्रतिकारशक्ती वाढवणे अत्यंत गरजेचे आहे, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. ही प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी एक चांगला उपाय आहे योगासन. योगाने आपण शारीरिक नाही तर मानसिकदृष्या सुदृढ राहतो.
हेही वाचा - International Yoga Day २०२० : जाणून घ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाविषयी...
हेही वाचा - 'योग हे एकतेचे प्रतिक.. ते कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही'