नवी दिल्ली - भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत आहे. गेल्या २४ तासात भारतात एकूण ६७ हजार १५१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा ३२ लाख ३४ हजार ४७५ इतका झाला आहे.
देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ही चिंताजनक बाब आहे. गेल्या २४ तासात कोरोनामुळे तब्बल १ हजार ५९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण मृतांचा आकडा हा ५९ हजार ४४९ इतका झाला आहे.
देशात आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी २४ लाख ६७ हजार ७५९ रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर सध्य स्थितीत ७ लाख ७ हजार २६७ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात सध्या सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्या ७ लाख ३ हजार ८२३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २२ हजार ७९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात मंगळवारी १० हजार ४२५ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. तर १२ हजार ३०० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ५ लाख १४ हजार ७९० रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण १ लाख ६५ हजार ९२१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७३.१४ % झाले आहे.