नवी दिल्ली - सिक्कीमच्या नाकू-ला प्रांतामध्ये असलेल्या भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या जवानांमध्ये आज बाचाबाची झाली. या पार्श्वभूमीवर सीमा भागामध्ये तणाव निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांच्या जवानांदरम्यान आज कोणत्यातरी कारणावरुन वाद निर्माण झाला. याचे रुपांतर पुढे बाचाबाची आणि हाणामारीमध्ये झाले. यावेळी झालेल्या हाणामारीमध्ये काही जवान जखमी झाले. यानंतर दोन्ही बाजूच्या जवानांनी आवरते घेतल्यामुळे हे प्रकरण तेवढ्यावरच थांबले. मात्र सीमा भागामध्ये अद्यापही तणावाचे वातावरण आहे.
अशा प्रकारच्या घटना साधारणपणे होत नाहीत. जवानांमध्ये होत असलेले वाद हे साधारणपणे तिथल्या तिथे मिटवले जातात, असे एका लष्करी सूत्राने सांगितले.
हेही वाचा : मालदीवमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन INS जलाश्व कोची बंदरात दाखल