श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये शस्त्रांची तस्करी करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडला. ही गेल्या पाच दिवसांतील दुसरी घटना आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात शस्त्रांची तस्करी होत असताना, उत्तर काश्मीरच्या तंगधर सेक्टरमध्ये तैनात असलेल्या सैन्याने ही कारवाई केली.
जम्मू काश्मीर पोलीस आणि लष्कराने यासाठी सोमवारी सायंकाळी संयुक्त मोहीम हाती घेतली होती. जप्त केलेल्या शस्त्रांमध्ये ५ पिस्तूल, १० काडतूसे आणि १३८ बॉम्बचा समावेश आहे. ग्लोबल फायनॅन्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएचटीएफ) पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना पैसा पुरवण्याबाबत कारवाईची हालचाल सुरू केली आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग करून अनेकदा दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आता शस्त्र तस्करीचा प्रकार समोर आला आहे.