जयपूर- राजस्थानमधील श्रीगांगानगरातली सूरतगढमध्ये मंगळवारी रात्री ८.१५ वाजता हवाईदलाचे मिग २१ लढाऊ विमान अपघातग्रस्त झाले. खराब हवामानामुळे हा अपघात झाला असल्याची माहिती हवाईदलाकडून देण्यात आली. सूरतगडच्या विमानतळाजवळ हा अपघात झाला असून सुदैवाने वैमानिकाला वाचवण्यात यश आले आहे. हवाईदलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
उड्डाण भरताच विमानाच्या इंजिनाला आग
विमानतळावरुन उड्डाण करताच विमानाच्या इंजिनला आग लागली. मात्र, वैमानिक वेळीच सुरक्षित बाहेर पडल्यामुळे दुर्घटना टळली.
मिग २१ चा वापर करणारा भारत तिसरा देश
रुस आणि चीननंतर मिग २१ चा संरक्षण दलात सामावेश असणारा भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. १९६४ साली या विमानाचा सुपरसेनिक लढाऊ विमानाच्या रुपात हवाईदलात सामावेश करण्यात आला होता. सुरुवातीला हे लढाऊ विमान रुसमध्ये बनवले जायचे. मात्र, भारताने ही विमाने बनवण्याचे तंत्रज्ञान शिकून घेतले. तेव्हापासून आत्तापर्यंत मिग २१ ने १९७१ साली झालेले भारत- पाकिस्तान युद्ध, १९९९ साली झालेले कारगिल युद्धात महत्वाची भुमिका निभावली आहे. १९८५ साली रुसने या विमानांची निर्मित करणे बंद केले. मात्र, भारताने नवनवीन बदल करत या विमानांचा वापर चालूच ठेवला.
२६ नोहेंबर २०२० झाला होता अपघात
२६ नोहेंबर २०२० हवाईदलाच्या सरावादरम्यान एक मिंग २९ के हे विमान अरबी समुद्रात अपघातग्रस्त झाले होते. या अपघातात एका वैमानिकाला वाचविण्यात यश आले होते तर दुसरा वैमानिक निशांत सिंह बेपत्ता होता. ११ दिवस शोध घेतल्यानंतर निशांत सिंह यांचे शव आढळून आले होते.