बिजिंग - कोरोना विषाणूने चीनमध्ये आरोग्य आणीबाणी आली आहे. विषाणूची लागण झालेल्यांची संख्या ६० हजारांपेक्षा जास्त झाली आहे. ही परिस्थिती हाताळताना चीनला अपयश येताना दिसत आहे. त्यामुळे शेजारच्या देश कोरोनाशी लढा देत असताणा भारत आता वैद्यकीय मदत पाठवणार असल्याचे चीनमधील भारतीय राजदूत विक्रम मिस्त्री यांनी सांगितले आहे.
कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये आत्तापर्यंत १ हजार ६६५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर लागण झालेल्यांची संख्या ६८ हजार ५०० झाली आहे. चीन व्यतिरिक्त २६ देशांमध्ये विषाणूचा प्रसार झाला आहे. त्यामुळे जगभर कोरोना पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
कोरोना विषाणू विरोधातील लढाईत भारत चीनसोबत आहे. चीनची जनता आणि सरकार कोरोनाशी सामना करत आहे. यामध्ये भारतही सर्वोतोपरी चीनला मदत करील. सद्यस्थितीत भारतातही कोरोनाची प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांचे आरोग्य सांभाळण्याासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, चीनला अडचणीच्या काळात मदत करण्यास आम्ही तयार असल्याचे मिस्त्री म्हणाले.
विषेशतहा: हुबेई आणि वुहान भागातील नागरिकांना भारत मदत करणार आहे. ज्या नागरिकांना विषाणूची लागण झाली त्यांच्याबरोबर आणि पीडित कुटुंबीयांसोबत आम्ही आहोत. चीन सरकार आणि नागरिक कोरोना विषाणूशी मोठ्या हिंमतीने लढा देत आहेत, त्यांचे कौतूक मिस्त्री यांनी केले. भविष्यात लवकरच हा भयंकर विषाणूचा प्रसार आटोक्यात येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.