ETV Bharat / bharat

दिलासा : 'कोरोना रिकव्हरी रेट'मध्ये भारत प्रथम क्रमांकावर - कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट न्यूज

भारतात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढला असून भारताने अमेरिकेला मागे टाकत पहिला क्रमांक मिळवला आहे. जगात भारताचा रिकव्हरी रेट 19% , अमेरिकेचा 18.70 टक्के आणि ब्राझिलचा 16.90 टक्के आहे.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Sep 21, 2020, 1:35 PM IST

नवी दिल्ली - देशात एकीकडे कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत असतानाच दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढला असून भारताने अमेरिकेला मागे टाकत पहिला क्रमांक मिळवला आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली.

गेल्या 24 तासांत 93 हजार 356 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून भारतामध्ये आतापर्यंत एकूण 43 लाख लोक कोरोनामुक्त झाले आहेत. जगात भारताचा रिकव्हरी रेट 19%, अमेरिकेचा 18.70 टक्के आणि ब्राझिलचा 16.90 टक्के आहे.

तथापि, देशातील कोरोनाग्रस्तांनी 54 लाखांचा टप्पा पार केला आहे. देशात गेल्या 24 तासांत एकूण 86,961 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. तर, 1,130 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 54,87,580वर गेली आहे तर, देशात आतापर्यंत 87,882 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.