ETV Bharat / bharat

पाकिस्तान : ननकाना साहेब गुरुद्वारावर जमावाकडून दगडफेक

पाकिस्तानमधील शिखांचे पवित्रस्थळ ननकाना साहेब गुरुद्वारावर स्थानिक मुस्लीम रहिवासी जमावाने शुक्रवारी दगडफेक केली. या हल्ल्याच्या घटनेचा दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने निषेध व्यक्त केला आहे.

नकाना साहेब गुरूद्वारावर जमावाकडून दगडफेक

author img

By

Published : Jan 3, 2020, 11:16 PM IST

नवी दिल्ली - पाकिस्तानमधील शिखांचे पवित्रस्थळ ननकाना साहेब गुरुद्वारावर स्थानिक मुस्लीम रहिवासी जमावाने शुक्रवारी दगडफेक केली. या हल्ल्यावर दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने निषेध व्यक्त केला आहे. गुरुद्वारावरील हल्ल्याच्या निषेधार्थ समिती दिल्लीमधील पाकिस्तानी दूतावासाबाहेर निदर्शने करणार आहे.

जमावाने गुरुद्वारावर दगडफेक करत गेट तोडण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यांचे नेतृत्व मोहम्मद हसन याने केले असल्याचे डीएसजीएमसी अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी सांगितले. 'गुरुद्वारावर हल्ला करण्यापूर्वी हसनने एका सभेला संबोधित केले. शहरामध्ये एकाही शीख व्यक्तीला राहू देणार नाही. तसेच शहराचे नाव बदलून गुलाम अली मुस्तफा ठेवणार', असे भाषण त्याने सभेत दिले.

डीएसजीएमसी अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी हसनविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांना केली आहे. तसेच परराष्ट्र मंत्रालयानेही पत्रक जारी केले असून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. तोडफोड करणाऱ्यावर पाकिस्तान सरकारने कारवाई करावी. तसेच ननकाना साहेब गुरुद्वाराच्या सुरक्षितेसंबधी उपाययोजना करावी, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

पाकिस्तानातील एका हिंदू तरुणीचे अपहरण करून तिचे धर्मपरिवर्तन केल्याचा आरोपही हसनवर आहे. भारतामध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक समुदायावर हल्ले होत आहेत.

Intro:Body:

India Strongly Condemns Vandalism At Gurdwara Nankana Sahib In Pak

Vandalism At Gurdwara,Vandalism At Gurdwara In Pak,India-Pak,ननकाना साहेब गुरूद्वारा, जमावाकडून रूद्वारावर दगडफेक, पाकिस्तानात गुरुद्वारावर दगडफेक,

पाकिस्तान : ननकाना साहेब गुरूद्वारावर जमावाकडून दगडफेक 

नवी दिल्ली - पाकिस्तानमधील शिखांचे पवित्रस्थळ ननकाना साहेब गुरूद्वारावर स्थानिक मुस्लिम रहिवासी जमावाने शुक्रवारी दगडफेक केली. या हल्ल्यावर दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने निषेध व्यक्त केला आहे. गुरुद्वारावरील हल्ल्याच्या निषेधार्थ समिती दिल्लीमधील पाकिस्तानी दूतावासाबाहेर निदर्शने करणार आहे.

जमावाने गुरूद्वारावर दगडफेक करत गेट तोडण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यांचे नेतृत्व मोहम्मद हसन याने केले असल्याचे डीएसजीएमसी अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी सांगितले. 'गुरुद्वारावर हल्ला करण्यापूर्वी हसनने एका सभेला संबोधीत केले. शहरामध्ये एकाही शीख व्यक्तीला राहू देणार नाही. तसेच शहराचे नाव बदलून गुलाम अली मुस्तफा ठेवणार', असे भाषण त्याने सभेत दिले.

डीएसजीएमसी अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी हसनविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांना केली आहे. तसेच परराष्ट्र मंत्रालयानेही पत्रक जारी केले असून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. तोडफोड करणाऱ्यावर पाकिस्तान सरकारने कारवाई करावी. तसेच ननकाना साहेब गुरुद्वाराच्या सुरक्षितेसंबधी उपाययोजना करावी, असे परराष्ट्र मंत्रालयाने  म्हटले आहे.

पाकिस्तानातील एका हिंदू तरुणीचे अपहरण करून तीचे धर्मपरिवर्तन केल्याचा आरोपही हसनवर आहे. भारतामध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक समुदायावर हल्ले होत आहेत.

------------------------------------------------------------------------------

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.