ETV Bharat / bharat

CONVID१९: व्यापार आणि प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध हटवण्याचा भारताने विचार करावा, चीनचे राजदूत - china india relation

दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि प्रवासी वाहतूक सुरळीत करण्यासाठी भारताने पुन्हा विचार करावा. दोन्ही देशांमध्ये दरवर्षी दहा लाख नागरिक प्रवास करतात. तर दोन्ही देशांमध्ये ९० दशलक्ष डॉलरचा व्यापार चालतो, असे वेंगडोई म्हणाले.

राजदूत सन वेईंडोंग
राजदूत सन वेईंडोंग
author img

By

Published : Feb 19, 2020, 9:42 AM IST

नवी दिल्ली - चीननमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातल्यानंतर भारताने प्रवासी वाहतूक आणि व्यापारावर निर्बंध घातले आहेत. मात्र, भारताने प्रवासी वाहतूक आणि व्यापारावर लागू केलेल्या निर्बंधांवर पुनर्विचार करावा, असे चीनचे भारतातील राजदूत सन वेईंडोंग यांनी सांगितले.

चीनी दुतावासामध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'वस्तूनिष्ठ, तार्किक आणि शांततेने विचार करून भारताने निर्बंधांचा पुन्हा विचार करावा. तसेच पंतप्रधान मोदी आणि शी जिगपिंग यांच्यामध्ये यावरून मतैक्य घडून यावे. चीनला वैद्यकिय साहित्याची गरज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीने विचार करून भारताने यावर निर्णय घ्यावा, असे ते वेईंडोंग म्हणाले.

चीनचे राजदूत दिल्लीत बोलताना

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी वाहतूक आणि व्यापारावर निर्बंध घातले जावे, असे अद्याप सांगितले नाही. त्यामुळे सर्वांनी जागतिक आरोग्य संघटेच्या निर्देशानुसार वागावे. सर्व देशांनी व्यापार आणि प्रवासी वाहतूक सूरू ठेवावी. तसेच अनावश्यक काळजी करण्याची गरज नाही, असे वेईडोंग म्हणाले.

भारताने चीनला देऊ केलेल्या वैद्यकिय मदतीचे वेंगडोंई यांनी कौतूक केले. तसेच हुबेई प्रांतात अ़डकून पडलेल्या भारतीयांची चांगली काळजी घेण्यात येईल, याचे आश्वासन दिले. दोन्ही देशांमध्ये कोरोनाच्या संसर्गावरून संवाद सुरू आहे. नुकतेच पंतप्रधान मोदींनी शी जिनपिंग यांना पत्र लिहून कोरोनाचा सामना करण्याासाठी सद्भावना व्यक्त केली. तसेच चीनच्या प्रयत्नांचे कौतूक केले. कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताने सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली आहे, असे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.