ETV Bharat / bharat

आज सर्वाधिक चाचण्यांसह सर्वात जास्त रुग्णांना मिळाला डिस्चार्ज - भारत कोरोनामुक्त रुग्णसंख्या

बुधवारी देशात एका दिवसातील सर्वाधिक कोरोना चाचण्यांची, तसेच सर्वाधिक रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याची नोंद झाली. आज एका दिवसात ५६ हजार ११० रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. यानंतर देशातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १६ लाख ३९ हजार ५९९वर गेली आहे.

India records highest single day recovery of COVID19
आज सर्वाधिक चाचण्यांसह, सर्वात जास्त रुग्णांना मिळाला डिस्चार्जआज सर्वाधिक चाचण्यांसह, सर्वात जास्त रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
author img

By

Published : Aug 12, 2020, 9:49 PM IST

नवी दिल्ली : बुधवारी देशात एका दिवसातील सर्वाधिक कोरोना चाचण्यांची, तसेच सर्वाधिक रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याची नोंद झाली. आज एका दिवसात ५६ हजार ११० रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. यानंतर देशातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १६ लाख ३९ हजार ५९९वर गेली आहे.

आज नोंद झालेल्या रुग्णांनंतर देशातील अ‌ॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या सहा लाख ४३ हजार ९४८ आहे. जी एकूण रुग्णांच्या २७.६४ टक्के आहे. देशातील आरोग्य व्यवस्थेने केलेल्या चांगल्या कामामुळे, देशातील कोरोना मृत्यूदर हा केवळ १.९८ टक्क्यांवर आला आहे, जो जागतिक मृत्यूदराच्या तुलनेत कितीतरी कमी आहे.

देशात कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण २.६ कोटी कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. लोकांनी फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे, मोठ्या प्रमाणात प्रवास करणे, तसेच वातावरणातील दमटपणा यामुळे हे होत असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची सर्वाधिक वाढ दिसून येत असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.