ETV Bharat / bharat

सीमारेषेबाबत तणाव असताना भारत-नेपाळमध्ये पुढील आठवड्यात चर्चा - Vinay Mohan Kwatra to talk Nepal

देशांमधील कालापानी, लिपूलेख आणि लिमीपियाधूरा हे तीन भूभाग नेपाळचा हिस्सा असल्याचा नेपाळ सरकारने दावा केल्याने दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती आहे. त्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये चर्चा होत असल्याने ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

प्रतिकात्मक-भारत नेपाळ संबंध
प्रतिकात्मक-भारत नेपाळ संबंध
author img

By

Published : Aug 13, 2020, 2:01 PM IST

नवी दिल्ली – भारत आणि नेपाळ हे दोन्ही देशांमधील संवाद व्यवस्थेचा पुढील आठवड्यात आढावा घेणार आहेत. या बैठकीत हिमालयन भागामधील रखडेलल्या प्रकल्पाबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

नेपाळमधील भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा हे नेपाळचे परराष्ट्र मंत्रालय सचिव शंकरादास बैरागी यांच्या चर्चा करणार आहेत. देशामधील कालापानी, लिपूलेख आणि लिमीपियाधूरा हे तीन भूभाग नेपाळचा हिस्सा असल्याचा नेपाळ सरकारने दावा केल्याने दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती आहे. त्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये चर्चा होत असल्याने ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

नेपाळ सरकारने राजकीय नकाशातही भारतामधील भूगाग नेपाळमध्ये दाखविला आहे. भारत आणि नेपाळ हे दोन्ही देश संवाद व्यवस्थेचा 17 ऑगस्टला आढावा घेणार असल्याचे सूत्राने सांगितले.

भारताने नेपाळचा फेटाळला आहे दावा-

भारताकडून नेपाळमधील पायाभूत विकासांसाठी अनेक वर्षांपासून मदत करण्यात येत आहे. तिन्ही भूभाग नेपाळमध्ये असल्याचा दावा हा इतिहासातील वस्तुस्थितीवर व पुराव्यावर आधारित नाही. नेपाळचा दावा म्हणजे कृत्रिमपणे केलेला विस्तार आहे, असे भारत सरकारने म्हटले होते. सीमेबाबत रखडलेल्या प्रश्नाबाबत नेपाळच्या कृतीने उल्लंघन झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.