ETV Bharat / bharat

देशातील कोरोना रुग्णांनी ओलांडला 70 लाखांचा टप्पा; तर 1 लाख मृत्यू

देशातील एकूण रुग्णांची संख्या 70 लाख 53 हजार 807 वर पोहचली आहे. तर 8 लाख 67 हजार 496 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर महाराष्ट्रात सध्या 2 लाख 21 हजार 615 जणांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 40 हजार 40 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Oct 11, 2020, 1:09 PM IST

नवी दिल्ली - चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभारत थैमान घातले आहे. आज भारतातमधील कोरोना रुग्णांनी 70 लाखांचा आकडा पार केला आहे. गेल्या 24 तासांत 74 हजार 383 रुग्णांची भर पडली. तसेच 918 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. राज्यनिहाय आकेडवारी पाहता, सर्वांत जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. दरम्यान नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असली तरी रिकव्हरी रेट सरासरीपेक्षाही वाढला आहे.

State-wise report
देशातील कोरोना रुग्णांची आकडेवारी

देशातील एकूण रुग्णांची संख्या 70 लाख 53 हजार 807 वर पोहचली आहे. तर 8 लाख 67 हजार 496 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे, 60 लाख 77 हजार 977 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तसेच 1 लाख 8 हजार 334 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सध्या 2 लाख 21 हजार 615 जणांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 40 हजार 40 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडूमध्ये 10 हजार 187 आणि कर्नाटकात 9 हजार 891 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 10 ऑक्टोबरपर्यंत देशात 8,कोटी 68 लाख 77 हजार 242 नमूने तपासले गेले. यातील 10 लाख 78 हजार 544 नमून्यांची काल तपासणी करण्यात आली. आयसीएमआरकडून ही माहिती मिळाली आहे.

कधी संपते कोरोना साखळी -

एका कोरोनाग्रस्तापासून दुसऱ्या व्यक्तीला लागण होण्याची साखळी तोडण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. एखाद्या भागात 28 दिवसांत एकही नवी कोरोनाची केस आढळली नाही, आणि शेवटी आढळलेल्या रुग्णाची चाचणी निगेटिव्ह आली तर, रुग्णांची साखळी तुटली असे समजण्यात येते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.