जैसलमेर (राजस्थान) - मोहनगढच्या नहरी परिसरात राजकीय उच्च माध्यमिक विद्यालय १० बीडीनगर येथे थांबलेल्या मजुरांकडून शेळीचे मांस जप्त केल्याचे उघड झाले आहे. रविवारी रात्री येथे थांबलेल्या मध्य प्रदेशचे मजूर ५ हजार ३०० रुपयात शेळीचे मांस खरेदी करून आणले आणि रात्री तिथेच बनवून खाल्ले. यावेळी शाळेतील शिक्षकही तिथे उपस्थित होता.
सोमवारी सकाळी या प्रकाराबद्दल ग्रामस्थांना कळले. संतापलेल्या ग्रामस्थांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलीस अधिकारी माणक राम विश्नोई यांनी घटनास्थळी पोहोचून लोकांना शांत केले. शिक्षक जियाराम निवासी लाणेला यासह मध्य प्रदेशच्या १९ जणांना अटक करण्यात आली आहे.
दुसऱ्या जिल्ह्यातील आणि दुसऱ्या राज्यातील मजुरांना सरकारी शाळांमध्ये ठेवण्यात आले आहे. रविवारी रात्री जेवायला न मिळाल्याची माहिती या लोकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर त्याच परिसरातून एक शेळी खरेदी करून भाजून खाल्ली. शाळेतील शिक्षक यावेळी त्यांच्यासोबत होता. पोलिसांनी सांगितले, की या प्रकरणाची माहिती आम्हाला मिळाली. आम्ही तिथे पोहोचून ग्रामस्थांना शांत केले आणि शिक्षकासह १९ जणांना अटक केली.