ETV Bharat / bharat

हाथरस बलात्कार प्रकरण : चारपैकी एक आरोपी निघाला अल्पवयीन - Hathras Gangrape case news

हाथरस बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एका आरोपीची शालेय गुणपत्रिका समोर आली आहे. यानुसार हा आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती उघड झाली आहे. कायद्यानुसार अल्पवयीन मुलास बाल सुधारगृहात पाठवले जाते. मात्र, पोलिसांनी याबाबत कोणतीही चौकशी न करता त्याला अटक केली; आणि तुरुंगात पाठवले. तसेच, त्याची ओळख पोलिसांनी उघड केली आहे.

हाथरस बलात्कार प्रकरण
हाथरस बलात्कार प्रकरण : चारपैकी एक आरोपी निघाला अल्पवयीन
author img

By

Published : Oct 20, 2020, 2:22 PM IST

अलीगड - हाथरस बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चार आरोपींमधील एक आरोपी हा अल्पवयीन आहे. त्याच्या शालेय गुणपत्रिकेच्या आधारावर तो अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, एफआयआरमध्ये हा आरोपी 18 वर्षांचा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर, पोलिसांनी कोणताही शाहनिशा न करता आरोपीला अलिगडच्या जिल्हा कारागृहात रवाना केले आहे.

हाथरस पोलिसांचा हलगर्जीपणा

हाथरसच्या चंदपा ठाण्यांतर्गत घडलेल्या या घटनेत पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली आहे. अशा कित्येक घटनांमध्ये पोलिसांचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. तर
आता या घटनेतील एका आरोपीची शालेय गुणपत्रिका समोर आली असून त्यानुसार हा आरोपी अल्पवयीन असल्याचे कळते. कायद्यानुसार अल्पवयीन मुलास बाल सुधारगृहात पाठवले जाते. मात्र, पोलिसांनी याबाबत कोणतीही चौकशी न करता त्याला अटक केली. तुरुंगात पाठवले तसेच, त्याची ओळख पोलिसांनीही उघड केली आहे.

शालेय गुणपत्रिकेवरून एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती

सीबीआय पथक या आरोपीच्या घरी चौकशी करण्यासाठी गेले होते. दरम्यान त्याची शालेय गुणपत्रिका या पथकाच्या हाती लागली. त्यानुसार आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले. त्याचबरोबर सीबीआय या प्रकरणी हाथरसच्या चंदपा पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस कर्मचार्‍यांची चौकशी करण्यात गुंतली आहे. यासंदर्भात सोमवारी निलंबित चंदपा पोलीस ठाण्याचे अधिकारी राम शब्द, पोलीस प्रभारी डीके वर्मा आणि अन्य पोलिसांची चौकशी करण्यात आली.

सोमवारी सीबीआयच्या पथकाने अलिगड जिल्हा कारागृहातील चार आरोपींशी सात तासांहून अधिक काळ संवाद साधला. तर, दुसरे एक पथक जेएन मेडिकल कॉलेजमध्ये चौकशी करून तथ्य गोळा करत आहे. दरम्यान, हे पथक जेएन मेडिकल कॉलेजमध्ये आठ तास थांबले आणि तेथे सात डॉक्टरांची चौकशी करून उपचार करणार्‍या डॉक्टरांचा जबाब नोंदवला. सीबीआय या प्रकरणी आरोपींना रिमांडवर घेऊन चौकशी करू शकते. मंगळवारीदेखील सीबीआयचे पथक येण्याची शक्यता असून ते जिल्हा कारागृहातील चारही आरोपींची पुन्हा चौकशी करू शकतात.

हेही वाचा - सरकार बरखास्त केले तरी चालेल पण...पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारला खडसावले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.