नवी दिल्ली - नवीन सरकार स्थापन झाल्याबद्दल काही दिवसांपूर्वी केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी योजनेअंतर्गत २ कोटी फ्री लॅपटॉप वाटणार आहे. यासाठी एका वेबसाईटवर नोंदणी करा, असे आव्हान करण्यात येत होते. परंतु, ही वेबसाईट केंद्र सरकारने नाही तर एका आयआयटीच्या विद्यार्थ्याने बनवली होती. याप्रकरणी पोलिसांना राकेश कुमार याला अटक केली आहे.
एका अनोळखीने मोदींचे सरकार स्थापन झाले म्हणून त्यांच्या नावाने www.modi-laptop.wishguruji.com या नावाने वेवसाईट काढून २ कोटी फ्री लॅपटॉपचे वाटप करणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलला मिळाली होती. वेबसाईट खरी वाटण्यासाठी मेक इन इंडियाचा लोगोही पोस्ट करण्यात आला होता. लोकांना यावर विश्वास ठेवून फ्री लॅपटॉपसाठी नोंदणी केली होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास केला. याप्रकरणी पोलिसांनी वेबसाईट जेथे बनली आहे. तेथील लोकेशन ट्रॅक केली आणि व्हीपीओ पुंडलोता, देगाना (नागौर जिल्हा) येथून राकेश कुमार याला अटक केली आहे, अशी माहिती दिल्ली सायबर सेलच्या पोलिसांनी दिली आहे.
नकली वेबसाईट बनवणारा राकेश कुमार हा २३ वर्षाचा असून त्याने त्याने २०१९ साली आयआयटी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. गुगलच्या जाहीरातीद्वारे पैसे कमावण्यासाठी त्याने ही वेबसाईट बनवली होती.