ETV Bharat / bharat

बिहार पूर: सरकारचं दुर्लक्ष....दरभंगा जिल्ह्यातील पुरग्रस्तांचे अन्नपाण्याविना हाल

author img

By

Published : Aug 8, 2020, 8:19 PM IST

सरकार किंवा कोणत्याही राजकारण्याने काहीही मदत केली नसून आमच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या गावकऱ्यांनी केला आहे. लहान पोराबाळांची खाण्यापिण्याचे हाल होत असताना जनावरांनाही चारा मिळत असल्याचे पीडित कुटुंबांनी सांगितले.

बिहार पुरग्रस्त
बिहार पुरग्रस्त

दरभंगा(बिहार) - राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. राज्यातील अनेक नद्यांना पूर आल्यामुळे लाखो लोकांना स्थलांतर करावे लागले आहे. तर अनेकांचा बळी देखील गेला आहे. गावांमध्ये पाणी शिरल्याने दरभंगा जिल्ह्यातील नागरिकांनी बागमती नदीच्या किनाऱ्यावर आश्रय घेतला आहे. सरकारचे आमच्याकडे दुर्लक्ष होत असून खाण्यापिण्याचे हाल होत असल्याची व्यथा या पूरग्रस्तांनी मांडली.

सखल भागात पुराचे पाणी शिरल्यामुळे उंच भागात आश्रय घेण्यासाठी नागरिकांचे लोंढे येत आहेत. सिरनिया, अम्माधी, सिनुरा या भागातल्या गावांमधील सुमारे 1 हजार कुटुंबांनी सिरनिया नदीच्या किनाऱ्यावर आश्रय घेतला आहे. त्यांची येथे सरकारने राहण्याची काहीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वत:च तंबू ठोकले आहेत. आपल्याबरोबर आणलेल्या जनावरांसोबत हालाखीत जीवन काढत आहेत.

सरकार किंवा कोणत्याही राजकीय नेत्याने काहीही मदत केली नसून आमच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या गावकऱ्यांनी केला आहे. लहान पोराबाळांची खाण्यापिण्याचे हाल होत असताना जनावरांनाही चारा मिळत असल्याचे पीडित कुटुंबांनी सांगितले. आमच्या घरात पाणी शिरले. मात्र, आमची परिस्थिती पाहायला कोणीही आले नाही, किंवा आम्हाला काही मदत केली, असे मोहन सदा या पुरग्रस्ताने सांगितले.

आम्ही कसेबसे करुन राहत आहोत. मात्र, खायला प्यायला नसल्याने आमची चिंता वाढली आहे, असे आणखी एका पीडिताने सांगितले. बिहारमध्ये पुरामुळे आत्तापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला तर 6 ऑगस्टपर्यंत 70 लाख जनता पुरामुळे प्रभावित झाली. दरभंगा जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसला असून 19 लाख नागरिक प्रभावित झाले आहे. केंद्रिय आणि राज्य आपत्ती निवारण पथके नागरिकांची मदत करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.