ETV Bharat / bharat

कोरोनावरील लस शोधण्यासाठी 'भारत बायोटेक' घेणार पुढाकार.. - कोरोना लस आयएमसीआर

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (बीबीआयएल) या कंपनीसोबत करार केला आहे. ज्यानुसार आता या दोन्ही संस्था एकत्रितपणे कोरोनाच्या लसीवर संशोधन करतील.

ICMR partners with BBIL for developing indeginious Covid19 vaccine
कोरोनावरील लस शोधण्यासाठी 'भारत बायोटेक' घेणार पुढाकार..
author img

By

Published : May 9, 2020, 10:12 PM IST

नवी दिल्ली - कोरोना विषाणूवर पूर्णपणे भारतीय बनावटीची लस तयार करण्यासाठी भारत बायोटेक कंपनी पुढे सरसावली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (बीबीआयएल) या कंपनीसोबत करार केला आहे. ज्यानुसार आता या दोन्ही संस्था एकत्रितपणे कोरोनाच्या लसीवर संशोधन करतील.

आयएमसीआरच्या पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये (एनआयव्ही) या विषाणूचा स्ट्रेन ठेवण्यात आला आहे. या विषाणूचा वापर करुन त्यावर लस तयार करण्यासाठी बीबीआयएल आणि आयएमसीआर हे संयुक्तरित्या प्रयत्न करतील. या स्ट्रेनला एनायव्हीमधून भारत बायोटेकच्या प्रयोगशाळेमध्ये हलवण्यात आले आहे. तसेच, याच्या लसीवर संशोधन करण्याचे कामही सुरू झाले असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

याबाबत भारत बायोटेकला जी काही मदत आवश्यक असेल, ती आसीएमआरकडून पुरवली जाणार आहे. लसीच्या संशोधनादरम्यान त्याची प्राण्यांवर चाचणीही करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा : राज्यात आज 1165 नवीन कोरोनाग्रस्तांची भर; एकूण रुग्णसंख्या 20 हजार 228

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.