ETV Bharat / bharat

हवाई दलाचा बॅकअप प्लॅन ; राफेलच्या लँडिंगसाठी जोधपूर विमानतळही सज्ज

author img

By

Published : Jul 29, 2020, 7:21 AM IST

आज पाच राफेल लढाऊ विमाने अंबाला भारतीय हवाई दलाच्या तळावर उतरणार आहेत. मात्र, अंबाला येथे हवामान खराब होत आहे. अशा परिस्थितीत भारतीय वायुसेनेने राफेल विमानांच्या लँडिंगसाठी दुसरा पर्याय म्हणून जोधपूर विमानतळही सज्ज केले आहे.

राफेल
राफेल

नवी दिल्ली - जगावर कोरोनाचे संकट असताना फ्रान्स भारताला वेळेत राफेल विमानांचा पुरवठा करत आहे. बुधवारी म्हणजे आज पाच राफेल लढाऊ विमाने अंबाला भारतीय हवाई दलाच्या तळावर उतरणार आहेत. मात्र, अंबाला येथे हवामान खराब होत आहे. अशा परिस्थितीत भारतीय वायुसेनेने राफेल विमानांच्या लँडिंगसाठी दुसरा पर्याय म्हणून जोधपूर विमानतळही सज्ज केले आहे.

सध्या अंबाला येथील हवामान इतर परिस्थिती सामान्य आहे. मात्र, वेळेवर जर अंबाला येथील हवामानात खराबी झाली. तर अडचण निर्माण होईल. म्हणून जोधपूर विमानतळही लँडिंगसाठी सज्ज करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नवीन लढाऊ विमानांच्या स्वागताची तयारी जोधपूर विमानतळावरही करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, अंबाला जिल्हा प्रशासनाने सोमवारी एअरबेसभोवती कलम 144 लागू केले आहे. राफेल लढाऊ विमानांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर तेथे कोणत्याही प्रकारच्या फोटोग्राफीवर बंदी घातली आहे.

सप्टेंबर 2016 मध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ क्षमतांना बळकट करण्यासाठी भारताने फ्रान्सबरोबर 36 राफेल विमाने 59,000 कोटींना खरेदी करण्याचा करार केला होता. राफेल लढाऊ विमानाची पहिली तुकडी ही अंबाला हवाई दल तळावर तैनात केली जाईल. भारतीय हवाई दलाचा हा तळ भारत-पाकिस्तान सीमेरेषेपासून 200 किमी अंतरावर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.