ETV Bharat / bharat

हवाई दलाने पाकचे 'एफ १६' विमान पाडले, 'हा' आहे पुरावा - एअर व्हाईस मार्शल आरजीके कपूर - pakistan

'पाकिस्तानने २७ फेब्रुवारीला केवळ एफ-१६ वापरलेच नाही तर, ते भारताकडून पाडण्यातही आले, याचे सबळ पुरावे भारतीय हवाई दलाकडे आहेत,' असे सांगण्यात आले आहे. 'मात्र, हे पुरावे सार्वजनिक करण्यावर सुरक्षा आणि गोपनीयतेची मर्यादा आहे,' असे कपूर यांनी सांगितले.

पाकचे 'एफ १६' पाडल्याचा पुरावा सादर
author img

By

Published : Apr 9, 2019, 2:39 PM IST

नवी दिल्ली - भारतीय हवाई दल (IAF) ने एक निवेदन जारी केले आहे. यात भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे एफ-१६ फायटर विमान पाडल्याचा सबळ पुरावा सादर केला आहे. हवाई दलातर्फे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यात पाकिस्तानचे एफ-१६ पाडल्याचे रडार छायाचित्रे दाखवण्यात आली. बालाकोट एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी २७ फेब्रुवारीला पाकिस्तानी फायटर विमाने भारतीय हवाई हद्दीत घुसली होती.

'त्यावेळी पाकिस्तानी एफ-१६ फायटर विमान आणि भारतीय मिग-२१ यामध्ये डॉगफाईट झाली. यात दोन विमाने पडली यात कुठलीही शंका नाही. त्यात एक विमान भारतीय हवाई दलाचे मिग-२१ बायसन होते तर दुसरे पाकिस्तानी हवाई दलाचे एफ-१६ विमान होते. रेडिओ ट्रान्सक्रिप्ट आणि इलेक्ट्रॉनिक सिगनेचरवरुन ते स्पष्ट होते' असे एअर व्हाईस मार्शल आरजीके कपूर यांनी सांगितले.

पाकचे 'एफ १६' पाडल्याचा पुरावा सादर
'पाकिस्तानने २७ फेब्रुवारीला केवळ एफ-१६ वापरलेच नाही तर, ते भारताकडून पाडण्यातही आले, याचे सबळ पुरावे भारतीय हवाई दलाकडे आहेत,' असे सांगण्यात आले आहे. 'मात्र, हे पुरावे सार्वजनिक करण्यावर सुरक्षा आणि गोपनीयतेची मर्यादा आहे,' असे कपूर यांनी सांगितले.पाकिस्तानी सैन्याच्या जनसंपर्क विभागानेच २७ फेब्रुवारीला एक वैमानिक आमच्या ताब्यात आहे तर दोन त्या भागात आहेत, असे म्हटले होते. पाकिस्तानी ISPR च्या डायरेक्टर जनरलनी (DG-ISPR) त्या वेळी काही अधिकृत निवेदने जारी केली होती. याची आठवण आरजीके कपूर यांनी करुन दिली. एफ-१६ आणि मिग-२१ या दोन्ही विमानांची इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर आणि रेडियो ट्रान्स्क्रिप्टद्वारे ओळख पटविण्यात आली. यासाठी भारतीय हवाई दलातर्फे अवॉक्स ( एयर बॉर्न वॉर्निंग अॅण्ड कंट्रोल सिस्टम -AWACS) च्या माध्यमातून घेण्यात आलेली रडार छायाचित्रेही सादर केली.

Intro:Body:

हवाई दलाने पाकचे 'एफ १६' विमान पाडले, 'हा' आहे पुरावा - एअर व्हाईस मार्शल आरजीके कपूर

नवी दिल्ली - भारतीय हवाई दल (IAF) ने एक निवेदन जारी केले आहे. यात भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे एफ-१६ फायटर विमान पाडल्याचा सबळ पुरावा सादर केला आहे. हवाई दलातर्फे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यात पाकिस्तानचे एफ-१६ पाडल्याचे रडार छायाचित्रे दाखवण्यात आली. बालाकोट एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी २७ फेब्रुवारीला पाकिस्तानी फायटर विमाने भारतीय हवाई हद्दीत घुसली होती.

'त्यावेळी पाकिस्तानी एफ-१६ फायटर विमान आणि भारतीय मिग-२१ यामध्ये डॉगफाईट झाली. यात दोन विमाने पडली यात कुठलीही शंका नाही. त्यात एक विमान भारतीय हवाई दलाचे मिग-२१ बायसन होते तर दुसरे पाकिस्तानी हवाई दलाचे एफ-१६ विमान होते. रेडिओ ट्रान्सक्रिप्ट आणि इलेक्ट्रॉनिक सिगनेचरवरुन ते स्पष्ट होते' असे एअर व्हाईस मार्शल आरजीके कपूर यांनी सांगितले.

'पाकिस्तानने २७ फेब्रुवारीला केवळ एफ-१६ वापरलेच नाही तर, ते भारताकडून पाडण्यातही आले, याचे सबळ पुरावे भारतीय हवाई दलाकडे आहेत,' असे सांगण्यात आले आहे. 'मात्र, हे पुरावे सार्वजनिक करण्यावर सुरक्षा आणि गोपनीयतेची मर्यादा आहे,' असे कपूर यांनी सांगितले.

पाकिस्तानी सैन्याच्या जनसंपर्क विभागानेच २७ फेब्रुवारीला एक वैमानिक आमच्या ताब्यात आहे तर दोन त्या भागात आहेत, असे म्हटले होते. पाकिस्तानी ISPR च्या डायरेक्टर जनरलनी (DG-ISPR) त्या वेळी काही अधिकृत निवेदने जारी केली होती. याची आठवण आरजीके कपूर यांनी करुन दिली. एफ-१६ आणि मिग-२१ या दोन्ही विमानांची इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर आणि रेडियो ट्रान्स्क्रिप्टद्वारे ओळख पटविण्यात आली. यासाठी भारतीय हवाई दलातर्फे अवॉक्स ( एयर बॉर्न वॉर्निंग अॅण्ड कंट्रोल सिस्टम -AWACS) च्या माध्यमातून घेण्यात आलेली रडार छायाचित्रेही सादर केली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.