ETV Bharat / bharat

माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, ..म्हणजे मी भारतीय नाही का?

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या वादामध्ये ज्येष्ठ अभिनेते नसरूद्दीन शाहानींही उडी घेतली आहे. मुंबईमध्ये बोलताना ते म्हणाले, की माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, म्हणजे मी भारतीय नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

I can't produce my birth certificate does that mean I'm not an Indian asks Naseeruddin Shah
'माझ्याकडे जन्माचा दाखला नाही म्हणजे काय मी भारतीय नाही?
author img

By

Published : Jan 22, 2020, 7:16 PM IST

Updated : Jan 22, 2020, 8:01 PM IST

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत विचारले असता, आपण घाबरलेलो नाही तर संतापलो आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते नसरूद्दीन शाह यांनी दिली. माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, मी आता तो तयारही करू शकत नाही, तर मग मी भारतीय नाही का? आणि ७० वर्षे या देशात केलेले वास्तव्य हा माझ्या भारतीय असण्याचा पुरावा नाही का? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

या कायद्याबाबत विचार करत असताना, एक मुस्लीम म्हणून नाही तर देशाचा नागरिक म्हणून मला काळजी वाटते. माझ्या पाच पिढ्या या देशाच्या मातीत दफन आहेत. मी या देशाच्या सामाजिक जडणघडणीमध्ये, शिक्षण व्यवस्थेमध्ये काही योगदान दिले आहे. मग मी या देशाचा नागरिक नाही का? असे मत त्यांनी व्यक्त केले.

अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज, रिचा चड्ढा अशा बॉलिवूडकरांनंतर आता नसरूद्दीन शाहांनीदेखील या कायद्याला आपला विरोध दर्शवला आहे.

देशातील एक निर्वासित, जो आपल्या मालकीचे सर्वकाही सोडून इथे आला आहे, जो आपले प्राण वाचवण्यासाठी धडपड करत आहे त्याने काय अरबी देशांमध्ये जावे अशी तुमची अपेक्षा आहे का? असा प्रश्न त्यांनी उद्विग्नपणे विचारला. ते पुढे म्हणाले, की हे मी एक मुस्लीम म्हणून नाही बोलत. मी स्वतःला कधी एक मुस्लीम मानलेही नाही, किंवा माझ्या मुस्लीम असण्याकडे मी कधीही अडथळा म्हणून पाहिले नाही.

देशभरात या कायद्याविरोधी सुरू असलेल्या आंदोलनांबाबत शाह म्हणाले, की देशातील युवा वर्ग आता जागा झाला आहे. या आंदोलनांना कोणताही म्होरक्या नाही. हा देशातील युवा वर्गाचा रोष आहे. या रोषाकडे दुर्लक्ष केल्यास, किंवा हा दाबून टाकण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आपल्यासाठी धोका निर्माण करणे आहे. या सगळ्या प्रकारात सर्वात जास्त दुर्दैवी बाब म्हणजे, विद्यार्थ्यांचा आणि बुद्धिजीवी लोकांचा होत असलेला तिरस्कार.

तुमची प्रसिद्धी कमी झाली तर तुम्ही मराल काय..?

यावेळी बोलताना शाहांनी बॉलिवूडकरांच्या शांत असण्यावर आवाज चढवला. इथले प्रस्थापित लोक का शांत आहेत ते मला माहिती आहे. त्यांची प्रसिद्धी कमी होण्याची भीती त्यांना आहे. मात्र, प्रसिद्धी किंवा व्यवसाय कमी झाल्याने तुम्ही काय मरणार आहात काय? तुमच्या सात पिढ्या बसून खातील एवढे तुम्ही आधीच कमवून ठेवले आहे ना? हे प्रस्थापित अभिनेते केवळ स्वतःपुरता विचार करतात, आपल्या अवती-भोवती असणाऱ्या लोकांचा नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

अनुपम खेर हे 'जोकर' आहेत..

चित्रपटसृष्टीमधील प्रस्थापित शांत असण्याबाबत बोलताना शाह पुढे म्हणाले, की मी ट्विटरसारख्या माध्यमांवर नाही. तिथे असणाऱ्या लोकांनी एक ठाम मत तयार करणे गरजेचे आहे. अनुपम खेर यांच्यासारखे लोक तिथे बरेच 'अ‌ॅक्टिव' असतात. मात्र, खेर यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, ते एक जोकर आहेत. त्यांच्यासोबत काम केलेल्या सर्व सहकाऱ्यांना विचारून तुम्ही त्यांच्या स्वभावाची माहिती करून घेऊ शकता. मात्र, ते त्यांच्या रक्तात आहे, त्याबद्दल कोणी काही करू शकत नाही.

दीपिका पादुकोनचे केले कौतुक..

यावेळी शाहांनी दीपिका पादुकोनचे कौतुक केले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या आंदोलनामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना भेट देऊन तिने आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला होता. दीपिकासारख्या अभिनेत्रीचे आपण कौतुक करायला हवे. सध्याच्या घडीला वरच्या फळीमध्ये असेलेल्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव येत असूनही, तिने हा पवित्रा घेतला ही नक्कीच धाडसाची बाब आहे. ती हे सर्व कसे हाताळते ते आपण पाहू. या पवित्र्यामुळे तिचे नक्कीच काही चाहते कमी होतील. मात्र, त्यामुळे ती गरीब होणार आहे का? कि तिची एकूण लोकप्रियता कमी होईल? यामुळे तिच्या सौंदर्यामध्ये घट होणार आहे का? नाही. असे म्हणत, चित्रपटसृष्टीचा एकमेव देव हा पैसा असल्याचे मत त्यांनी परखडपणे व्यक्त केले.

हेही वाचा : चंद्रशेखर आझादसह अन्य दोघांनी दाखल केली सीएए, एनपीआर अन् एनआरसीविरोधात जनहित याचिका!

Intro:Body:

ZCZC

PRI ENT ESPL NAT

.MUMBAI DES40

CAA-NASEERUDDIN SHAH

I'm not afraid, I'm angry: Naseeruddin Shah on CAA

       New Delhi, Jan 22 (PTI) Stating that he is not anxious but angry about the Citizenship (Amendment) Act, actor Naseeruddin Shah says he can't produce a birth certificate, like many other Indians, and asks why 70 years of living here is not proof enough of him being a citizen.

      The actor, who stressed that he was speaking as a concerned citizen and not a Muslim, said he has contributed to the country in the social and educational spheres and five generations of his family are buried in this land.

     Shah, one of Hindi cinema's best known actors, joins others from the industry such as Anurag Kashyap, Vishal Bhardwaj and Richa Chadha to speak on the intense debate over the CAA.  

     "I don't have a birth certificate. I cannot produce one. Does that mean we are all going to be excluded? I do not need any reassurances that Muslims don't need to worry. I am not worried," Shah said in an interview to The Wire.

     "If living here for 70 years does not prove me to be an Indian, I don't know what does. I am not afraid, I am not anxious, I am angry that such a law has been imposed on us," the 70-year-old added.

    Referring to the protests across the country, he said the youth has risen and suddenly realised they are being trampled upon.

    The CAA seeks to grant citizenship to migrants belonging to the Hindu, Sikh, Buddhist, Christian, Jain and Parsi communities who came to the country from Pakistan, Bangladesh and Afghanistan on or before December 31, 2014, but leaves out Muslims.The government has been saying that the CAA does not target the Muslim community.

    "You expect a refugee who is running for his life, who with his meagre belongings trying to outlive a trauma of leaving everything he owned and everything he loved and trying to cross the border to book a ticket to Jeddah? You expect him to go to UAE?" Shah asked.

     He said he was not speaking as a Muslim and had never thought of himself as one.  "I have not seen it as an obstacle in anyway," he added.

     What hurt the most, Shah said, was the "contempt" for the student community and intellectuals.

    “There's no leader in this movement, it's all spontaneous anger that is arising. If you dismiss the anger of the youth, you are creating dangers for yourself. That's all I can say,” he said.

     Shah also spoke about the silence of big stars of the industry.

     “As far as the established figures are considered, it's understandable why they don't speak up. One does wonder how much do they have to lose? Haven't you made enough to last you seven generations?

    "It does seem to be like that. Loss of popularity, loss of revenue… will it kill you? The star is basically concerned with themselves and not other people around, otherwise there would be more parity."

    The outspoken actor, who has been vocal on many issues in the past, also praised Deepika Padukone, who went to the Jawaharlal Nehru University during a public meeting and stook silently behind student leaders.

      “You have to laud the courage of a girl like Deepika who is in the top... and yet takes a step like this. Let us see how she takes this. She'll lose a few endorsements, sure. Will that impoverish her? Will that lessen her popularity? Will that make her less beautiful than she is?"

     "The only god that the film industry worships is money," he added caustically.

      Asked about instances of period films being made to rewrite history, the actor said there was nothing new in it.    

    "The film industry has always pandered to those in power. There is too money at stake. They do what pleases the centre. I really wonder how much conviction there is in these filmmakers who are helping rewrite history and what is the purpose of it." PTI BK RDS

            BK MIN

MIN

01221848

NNNN

Conclusion:
Last Updated : Jan 22, 2020, 8:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.