हैदराबाद - आज सकाळी हैदराबादमध्ये पोलिसांनी डॉक्टर महिलेच्या बलात्काराप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या चार आरोपींचा एन्काऊंटर केला. हैदराबादमधील राष्ट्रीय महामार्ग 44 जवळील या घटनेबाबत संमिश्र प्रतिक्रीया पुढे येत आहेत.सकाळी वाऱ्यासारख्या पसरलेल्या या बातमीने सर्व स्तरांतून वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली. यानंतर सर्वत्र एकाच नावाचा गौरव होत आहे; ते म्हणजे पोलीस आयुक्त व्ही सी सज्जनार...
14 मार्च 2018 ला त्यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. यानंतर गेल्या वर्षी हैदराबादचा देशातील सर्वात शांत शहरांमध्ये उल्लेख करण्यात आला होता. शहरात घटलेला क्राईम रेट याचेच द्योतक होते. परंतु, 27 तारखेला महिला डॉक्टरवर झालेल्या हत्येची बातमी पसरली. यानंतर वैद्यकीय तपासात शारिरीक आत्याचार झाल्याचे समोर आले; आणि देशभरातून एकेकाळी शांत शहर म्हणून ओळख असणाऱ्या शहराची प्रतिमा मलिन झाली. पोलिसांनी तत्परता दाखवत 48 तासांत आरोपींना ताब्यात घेतले. सर्व समाजमाध्यमांतून आरोपींना फाशी देण्याची मागणी होत असतानाच सायबराबाद पोलिसांनी आरोपींचा एन्काऊंटर केल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे.
-
Sri VC Sajjanar,IPS took charge as
— Cyberabad Police (@cyberabadpolice) March 14, 2018 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Commissioner of police, @cyberabadpolice pic.twitter.com/89g96EVFoA
">Sri VC Sajjanar,IPS took charge as
— Cyberabad Police (@cyberabadpolice) March 14, 2018
Commissioner of police, @cyberabadpolice pic.twitter.com/89g96EVFoASri VC Sajjanar,IPS took charge as
— Cyberabad Police (@cyberabadpolice) March 14, 2018
Commissioner of police, @cyberabadpolice pic.twitter.com/89g96EVFoA
या खटल्याचा तपास सुरू असताना आयुक्त सज्जनार यांनी घटनाक्रम कसा घडला हे दाखवण्यासाठी आरोपींना घटनास्थळी नेण्याची संमती मागितली. घटनाक्रम स्पष्ट होण्यासाठी घटनास्थळी गेल्यानंतर पोलिसांनी त्यांचा एन्काऊंटर केला. आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्न करत असल्याने हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
या सर्व घटनाक्रमाचा केंद्रबिंदू व्ही सी सज्जनार हेच होते. याधीही सज्जनार यांनी एन्काऊंटर केल्याने त्यांचे नाव कायम चर्चेत होते. ते 1996 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आंध्र प्रदेशातील माओवाद्यांच्या एन्काऊंटरमध्येही त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
वारंगल एन्काऊंटर
एन्काऊंटर स्पेशलिस्ट व्ही सी सज्जनार यांनी 2008 साली (तेव्हाचा आंध्र प्रदेश) तेलंगणामधील वारंगल येथे कॉलेजच्या मुलीवर अॅसिड फेकलेल्या घटनेतील तीन आरोपींना कंठस्नान घातले होते. या घटनेत इंजिनियरींगला असणाऱ्या विद्यार्थिनीवर अॅसि़ड फेकण्यात आले होते. यावेळी अधीक्षक पदावरील सज्जनार यांच्या पथकाने आरोपींना अटक केली. या प्रकारानंतर मोठ्या प्रमाणात विवाद झाले. हे आरोपी कस्टडीत असताना पोलिसांवर हल्ला चढवल्याने त्यांना गोळ्या घातल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होते.