ETV Bharat / bharat

मध्य प्रदेश : धर्मांतरणासाठी पत्नीवर दबाव आणणाऱ्या पतीला अटक

शहडोल जिल्ह्यातील धनपुरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी (एसडीओपी) भरत दुबे यांनी सांगितले की, या भागातील एका हिंदू महिलेने इरशाद नावाच्या मुस्लीम युवकाशी लग्न केले होते. ही महिला आणि इरशाद गेल्या दोन वर्षांपासून एकत्र राहत होते. धर्म बदलण्यासाठी पती दबाव आणत आहे. तसेच, इस्लामच्या संस्कृतीचे पालन करण्यासाठी, उर्दू आणि अरबी भाषा शिकण्यासाठी पती आपले शोषण करीत आहे, असा आरोप या महिलेने केला आहे.

मध्य प्रदेश लव्ह जिहाद न्यूज
मध्य प्रदेश लव्ह जिहाद न्यूज
author img

By

Published : Dec 2, 2020, 6:24 PM IST

शहडोल / भोपाळ - जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडणार्‍यांविरुद्ध कायदा तयार करण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे मध्य प्रदेश सध्या चर्चेत आहे. दरम्यान, शहडोल जिल्ह्यातील हिंदू महिलेशी लग्न झाल्यानंतर तिच्यावर धर्मांतरणासाठी दबाव आणल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी मुस्लीम युवकास पोलिसांनी अटक केली आहे.

शहडोल जिल्ह्यातील धनपुरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी (एसडीओपी) भरत दुबे यांनी सांगितले की, या भागातील एका हिंदू महिलेने इरशाद नावाच्या मुस्लीम युवकाशी लग्न केले होते. ही महिला आणि इरशाद गेल्या दोन वर्षांपासून एकत्र राहत होते. धर्म बदलण्यासाठी पती दबाव आणत आहे. तसेच, इस्लामच्या संस्कृतीचे पालन करण्यासाठी, उर्दू आणि अरबी भाषा शिकण्यासाठी पती आपले शोषण करीत आहे, असा आरोप या महिलेने केला आहे.

हेही वाचा - चहाला पुन्हा उकळी! रेल्वेस्थानकात प्लास्टिक कपाऐवजी आता 'कुल्हड'

दुबे यांच्या म्हणण्यानुसार, पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करून तुरुंगात ठेवण्यात आले आहे. मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य अधिनियम 1968 अंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे.

आगामी विधानसभा अधिवेशनात धर्मांतरण आणि लव्ह जिहादची वाढती प्रकरणे थांबविण्यासाठी मध्य प्रदेश सरकार 'मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य विधेयक -२०२०' आणण्याची तयारी करत आहे. या नवीन कायद्यात जबरदस्तीने धर्मांतरण करवल्यास किंवा त्यासाठी दबाव आणल्यास पाच वर्षांपर्यंतची शिक्षा देण्याची तरतूद असेल.

यापूर्वीही भोपाळमध्ये एका महिलेने तिच्या पतीवर जबरदस्तीने धर्मांतरण करवण्यासाठी आपली ओळख लपवून ठेवून लग्न केल्याचा आरोप केला होता. याची तक्रार गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्याकडे करण्यात आली. यावर मिश्रा म्हणाले होते की, भोपाळ येथील एका महिलेने आपल्याला धमकावले आणि लग्न करून धर्मांतर करण्यास भाग पाडले अशी तक्रार दिली आहे. पीडितेची तक्रार ऐकल्यानंतर डीआयजी भोपाळ यांना या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे.

हेही वाचा - हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीचे मतदान पार पडले, चार डिसेंबरला निकाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.