लहान मुलांना कोरोनाच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पालकांना स्वच्छता, मुलांना योग्य सवयी लावण्यासाठी तसेच मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरोगी ठेवण्याशी संबंधित मुद्द्यांविषयी माहिती असणे आवश्यक आहे. ईटीव्ही भारत सुखीभवने याबद्दल डॉ. विजयानंद जमालपुरी यांच्याशी बातचीत केली. डॉ जमालपुरी हे एमडी, एमआरसीपीसीएच, एफआरसीपीसीएच, सीसीटी इन पेडियाट्रिक्स (यूके) आणि फेलोशिप इन न्यूऑनोलॉजी (एनझेड), सल्लागार नवजात बालरोग तज्ञ, रेनबो चिल्ड्रन्स हॉस्पिटल, हैदराबाद येथे कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत केलेल्या चर्चेचा काही सारांश..
या साथीच्या आजारात लहान मुलांच्या पालकांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
- घरात एसी असल्यास हरकत नाही. मात्र, कूलर वापरू नका. कूलरमुळे आर्द्रता वाढते. तसेच घरात सेंट्रलाईज्ड एसी ठेवू नका. घरात हवा खेळती राहिल्यास मुलांच्या आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो.
- कोरोनाचे संक्रमण वाढत असताना मुलांना बाहेर किंवा एकत्र गोळा करून खेळू देणे अथवा वाढदिवस साजरे करणे अत्यंत चुकीचे आहे, असे डॉ. जमालपुरी सांगतात.
- आपल्या बाळाला नियमित तपासणीसाठी नेऊ नका. मात्र, त्यांच्या लसी चुकता कामा नये. रुग्णालयात भेटीसाठी वेळ घेऊन सोशल डिस्टंसचे पालन करा. बर्याच डॉक्टरांनी आता व्हिडिओ कंस्टल्टेशनला सुरुवात केली आहे, त्याला काही मर्यादा आहेत, त्या मर्यादा जाणून पालकांनी मुलांसाठी योग्य ते निर्णय घ्यावे.
तुमच्या बाळाला वैद्यकीय मदत/ उपचार हवे आहेत, हे कसे ओळखाल?
- जर तुमच्या बाळाला ताप असेल, श्वास घेण्यास अडचण होत असेल किंवा खूप श्वासोच्छवास घेत असेल, खेळणे कमी झाल्यास, जेवण कमी झाल्यास मुलाची प्रकृती ठीक नाही, असे समजून त्याला उपचारासाठी न्यावे.
- तुमच्या बाळाच्या दैनंदिन हालचालीत बदल जाणवत असेल, तर त्याला डॉक्टरांकडे दाखवा.
या साथीच्या आजारात आपण लहान मुलांच्या पालकांना कोणता सल्ला द्याल?
नवजात मुले, लहान बाळ त्यांना काही होत असल्यास सांगू सकत नाहीत. अशा परिस्थितीत पालकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या मुलांची देखभाल करण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी पालकांनी स्वतःस शिक्षित करणे आवश्यक आहे. आपल्या मुलाशी संबंधित प्रत्येक गोष्टीसाठी डॉक्टरांवर जास्त अवलंबून राहणे चांगले नाही.
तसेच पहिल्यांदा पालक झालेल्या लोकांसाठी - तुमच्या घरातील मोठ्यांनी दिलेले सल्ले नाकारू नका. त्यांचा अनुभव तुम्हाला तुमच्या बाळाच्या योग्य वाढीसाठी नक्कीच मदत करेल. त्यामुळे त्यांचे ऐका.
जर पालक बाळासोबत जास्त वेळ घालवत नसतील, तर त्यांच्या मुलांमध्ये होणारे लहान-मोठे बदल त्यांना लगेच जाणवणार नाहीत. त्यामुळे शक्य होईल तेवढा जास्त वेळ बाळाला द्या.
बाळांसाठी काळजीवाहू म्हणून डिजिटल उपकरणांचा वापर करणे खूप खर्चिक आहे. त्यामुळे मुलाला गुंतवून ठेवण्यासाठी कोणतेही डिजिटल डिव्हाइस वापरू नका. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत पालकाला डिजिटल डिव्हाइससोबत बदलू शकत नाही. त्यामुळे मुलांना कथा सांगणे, त्यांच्यासोबत खेळणे, त्यांना रंगांची ओळख करून देणे आवश्यक आहे.