ETV Bharat / bharat

गृहमंत्री अमित शाह १५ ऑगस्टला श्रीनगरच्या लाल चौकात  तिरंगा फडकवणार?

जम्मू काश्मीर राज्याचं दोन केंद्र शासित प्रदेशात विभाजन केल्यानंतर अमित शाह यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे. याआधी १९९२ मध्ये भाजपचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्यासह नरेंद्र मोदींनी लाल चौकात तिरंगा फडकवला होता.

अमित शाह
author img

By

Published : Aug 13, 2019, 2:33 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १५ ऑगस्टला श्रीनगर येथील लाल चौकात तिरंगा फडकवण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, अद्याप या बाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यांनी हे पाऊल उचललं तर ते आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरेल यात काहीही शंका नाही. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल ३७० हटवल्यानंतर आता श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यासाठी शाह पोहोचू शकतात.

सध्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल काश्मीर खोऱ्यात तळ ठोकून आहेत. १५ ऑगस्टला शाह यांच्या दौऱ्याची शक्यता लक्षात घेऊन येथे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर राज्याचं दोन केंद्र शासित प्रदेशात विभाजन केल्यानंतर अमित शाह यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे. मात्र, भारत-पाकिस्तानदरम्यानचा तणाव आणि दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर कोणतीच अधिकृत माहिती दिली गेलेली नाही.

याआधी १९९२ मध्ये भाजपचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्यासह नरेंद्र मोदींनी लाल चौकात तिरंगा फडकवला होता. त्यांनी पाकिस्तानकडून हल्ल्याचा तसेच, दहशतवाद्यांचा धोका असतानाही जम्मू-काश्मीरमध्ये ध्वजारोहण केले होते. कलम ३७० हटवल्यानंतर काय परिस्थिती आहे याचा आढावाही घेण्यात येत आहे.

Intro:Body:

---------------

गृहमंत्री अमित शाह श्रीनगरच्या लाल चौकात १५ ऑगस्टला तिरंगा फडकवणार?

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १५ ऑगस्टला श्रीनगर येथील लाल चौकात तिरंगा फडकवण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, अद्याप या बाबीची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यांनी हे पाऊल उचललं तर ते आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरेल यात काहीही शंका नाही. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल ३७० हटवल्यानंतर आता श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यासाठी शाह पोहोचू शकतात.

सध्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल काश्मीर खोऱ्यात तळ ठोकून आहेत. १५ ऑगस्टला शाह यांच्या दौऱ्याची शक्यता लक्षात घेऊन येथे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर राज्याचं दोन केंद्र शासित प्रदेशात विभाजन केल्यानंतर अमित शाह यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे. मात्र, भारत-पाकिस्तानदरम्यानचा तणाव आणि दहशतवादाच्या पाराश्वभूमीवर कोणतीच अधिकृत माहिती दिली गेलेली नाही.

याआधी १९९२ मध्ये भाजपचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्यासह नरेंद्र मोदींनी लाल चौकात तिरंगा फडकवला होता. त्यांनी पाकिस्तानकडून हल्ल्याचा तसेच, दहशतवाद्यांचा धोका असतानाही जम्मू-काश्मीरमध्ये ध्वजारोहण केले होते. कलम ३७० हटवल्यानंतर काय परिस्थिती आहे याचा आढावाही घेण्यात येत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.