ETV Bharat / bharat

हरिद्वारमध्ये तीर्थ पुरोहितांच्या दोन ते अडीच हजार गाद्या, त्यांची वही-खाती न्यायालयातही ग्राह्य

तीर्थ पुरोहितांच्या गादीअंतर्गत काही विशेष क्षेत्रे, राज्य, गावे, गोत्रे, जाती आहेत. याच्या आधारेच तीर्थ पुरोहितांचे यजमान कोण असतील, हे ठरते. सध्या धर्मनगरी हरिद्वारमध्ये तीर्थ पुरोहितांच्या जवळजवळ दोन ते अडीच हजार गाद्या आहेत, ज्यात संपूर्ण देशातील तीर्थ पुरोहित आहेत. तीर्थ पुरोहितांची सर्वांत किमती पूंजी त्यांची वही-खातीच असतात. ती इतकी महत्त्वपूर्ण आहेत की, न्यायालयात यांच्या आधारे दिलेली साक्षही ग्राह्य मानली जाते, असे तीर्थ पुरोहितांनी सांगितले.

author img

By

Published : Oct 8, 2020, 5:33 AM IST

हरिद्वारमध्ये तीर्थ पुरोहितांच्या दोन ते अडीच हजार गाद्या

लखनऊ - हिंदू धर्मात जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 प्रकारचे संस्कार केले जातात. तीर्थ पुरोहित असे ब्राह्मण आहेत, जे यजमानांसाठी पूजन-पाठ, कर्मकांड आणि अंत्यसंस्कार-क्रियाकर्मांसह सर्व धार्मिक कार्ये संपन्न करवून घेतात. हे सर्वजण पिढ्यान्-पिढ्या हे काम करत आहेत. तीर्थ पुरोहिताची मान्यता अशाच ब्राह्मणाला मिळते, ज्यांच्या पूर्वजांची हरिद्वारमध्ये गादी परंपरा स्थापन आहे. जेथे अनेक पिढ्यांपासून वंशपरंपरेने तीर्थ पौरोहित्याचे कार्य केले जाते.

काशी-हरिद्वारला हिंदू धर्मातील सर्वांत पवित्र सात धार्मिक क्षेत्रांपैकी एक मानले जाते. अनादि काळापासूनच हिंदू धर्मातील विविध पूजन-पाठ, क्रियाकर्म या मोक्ष नगरीत होत आले आहेत. तीर्थ पुरोहितच हे सर्व कर्मकांड करवून घेतात. ज्या पोथ्यांमध्ये यजमानांची नोंद ठेवली जाते, त्या पोथ्याच तीर्थ पुरोहितांची वडिलोपार्जित संपत्ती असते.

हेही वाचा - नोबेल 2020 : 'यांना' मिळाले रसायनशास्त्रातील नोबेल

तीर्थ पुरोहितांच्या गादीअंतर्गत काही विशेष क्षेत्रे, राज्य, गावे, गोत्रे, जाती आहेत. याच्या आधारेच तीर्थ पुरोहितांचे यजमान कोण असतील, हे ठरते. सध्या धर्मनगरी हरिद्वारमध्ये तीर्थ पुरोहितांच्या जवळजवळ दोन ते अडीच हजार गाद्या आहेत, ज्यात संपूर्ण देशातील तीर्थ पुरोहित आहेत. तीर्थ पुरोहितांची सर्वांत किमती पूंजी त्यांची वही-खातीच असतात. या खात्यांत वंशावळी व्यवस्थित लिहून ठेवलेल्या असतात. ही वही-खाती इतकी महत्त्वपूर्ण आहेत की, न्यायालयात यांच्या आधारे दिलेली साक्षही ग्राह्य मानली जाते, असे तीर्थ पुरोहितांनी सांगितले.

तीर्थ पुरोहित त्यांच्या वही खात्यांमध्ये यजमानांच्या शेकडो वर्षांचा पूर्ण इतिहास, वंशावळी, कर्मकांडासाठी आलेल्या व्यक्तीचे नाव, वडील, आजोबा-पणजोबांचे नाव, रहिवासी क्षेत्र, राज्य, गाव, गोत्र आणि जातीची संपूर्ण नोंद ठेवतात. तीर्थ पुरोहितांच्या वंशात मुलगा नसेल तर, वही खाती मुलीला मिळतात.

सामान्य वही-खात्याच्या पुस्तकासारखे दिसणाऱ्या तीर्थ पुरोहितांच्या वहीची किंमत लाखांमध्ये असते. ईटीव्ही भारतशी झालेल्या चर्चेत तीर्थ पुरोहितांनी सांगितले की, कोणत्याही वहीची किंमत ठरवण्यासाठी त्या वहीमधून येणारे वर्षभरातील उत्पन्न पाहिले जाते. याच्या आधारे वहीची किंमत ठरवली जाते.

हेही वाचा - 'वाघ विधवां'ची करुण कहाणी, सुंदरबनच्या जंगलातील भयाण वास्तव

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.