ETV Bharat / bharat

बाबरी मशीद विध्वंस : निकालानंतर उत्तर प्रदेशात हाय अलर्ट; जमावबंदी लागू - बाबरी निकाल जमावबंदी

सीबीआयचे विशेष न्यायालय कैसरबागमध्ये आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कैसरबागमध्ये असलेले बसस्थानक बंद करण्यात आले होते. तसेच, कैसरबाग ते सीतापूर मार्ग आणि कैसरबाग ते अयोध्या मार्गावरील बस बंद करण्यात आल्या आहेत.

High alert announced in UP after babri demolition verdict
बाबरी मशीद विध्वंस : निकालानंतर उत्तर प्रदेशात हाय अलर्ट घोषित; जमावबंदी लागू
author img

By

Published : Sep 30, 2020, 1:10 PM IST

लखनऊ : बाबरी मशीद प्रकरणाच्या निकालानंतर उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. संवेदनशील जिल्ह्यांमध्ये पॅरा-मिलिट्री पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच, कोणत्याही प्रकारचे मोर्चे काढण्यावर बंदी आणण्यात आली असून, राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

सीबीआयचे विशेष न्यायालय कैसरबागमध्ये आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कैसरबागमध्ये असलेले बसस्थानक बंद करण्यात आले होते. तसेच, कैसरबाग ते सीतापूर मार्ग आणि कैसरबाग ते अयोध्या मार्गावरील बस बंद करण्यात आल्या आहेत.

सीतापूर मार्गावरील बसेसना मडियांव येथेच थांबवण्यात येत आहे. तसेच, अयोध्या मार्गावरील बसेसना कमता चौराहा परिसरातील बसस्थानकावर थांबवण्यात आले आहे. प्रवाशांना बस स्थानकावरील प्रतीक्षा कक्षांमध्ये थांबवण्यात आले असून, पुढील सूचना मिळेपर्यंत बससेवा बंद ठेवण्यात आल्याची माहिती स्थानक संचालक शशिकांत यांनी दिली आहे.

हेही वाचा : हाथरस सामूहिक अत्याचार प्रकरणी एसआयटीची स्थापना; योगी आदित्यनाथांची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.