पुडूकोट्टाई (तामिळनाडू) - पुडूकोट्टाई जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडल्याचे वृत्त होते. पुडुकोटाई येथे 6 सदस्यांसह हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचे वृत्त आणि छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाले होते.
दरम्यान, ती बातमी केवळ अफवा असल्याचे सरंंक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. पुडूकोट्टाई येथे अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.