जयपुर - राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष डॉ. सीपी जोशी यांनी माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासहित 19 आमदारांना नोटिस जारी केली. याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज (सोमवारी) पुन्हा सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायाधीश इंद्रजीत महंती यांच्यासोबत न्यायाधीश प्रकाश गुप्ता यांच्या खंडपीठात सकाळी 10 वाजता ही सुनावणी होणार आहे.
शुक्रवारपर्यंत पायलट गटाच्या वतीने अधिवक्ता हरिश साळवे आणि मुकुल रोहतगींनी आपला युक्तिवाद पुर्ण केला आहे. तर आज (सोमवारी) विधानसभा अध्यक्षांचे वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवादाला सुरुवात करतील. न्यायालयाच्या आदेशाच्या पालनात बनविण्यात आलेले पक्षकार मुख्य सचेतक महेश जोशी उच्च न्यायालयात आपले उत्तर दिले आहे. या उत्तराला सोमवारी न्यायालयात रेकॉर्डवर देण्यात येईल. तर प्रत्युत्तरात जोशी यांनी याचिकेला प्रिमॅच्युर असे आहे, असे सांगत फेटाळण्याची मागणी केली आहे. सोमवारी विधानसभा अध्यक्षांकडून युक्तिवाद पुर्ण केल्यानंतर महेश जोशीही या प्रकरणात आपली बाजू मांडतील.
सचिन पायलट आणि अन्य यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे. याचिकेत मुख्यमंत्र्यांच्या प्रभावात नोटीस जारी केली आहे, असे सांगण्यात आले आहे. तर विधानसभा अध्यक्ष यांच्याकडून सांगण्यात आले आहे की, आतापर्यंत फक्त सचिन पायलटसहित अन्य आमदारांना नोटीस देण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून त्यांना अयोग्य घोषित करण्यात आलेले नाही. यामुळे याचिका प्रिमॅच्युअर असल्यामुळे फेटाळण्यात यावी.
विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून आमदांना जी नोटीस देण्यात आली त्यासंदर्भात गेल्या शुक्रवारी या प्रकरणातील युक्तिवाद अपूर्ण राहिला होता. यामुळे पुढील कारवाईला 21 जुलैला संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, उच्च न्यायालयात दोन्ही पक्षांच्या सहमतीने पुन्हा आज (सोमवारी) सकाळी 10 वाजता सुनावणी होणार आहे.