नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज( मंगळवारी) ६९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. जगातील लोकप्रिय नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदींची गणणा होते, देशातच नाहीतर परदेशातही मोदींचे अनेक चाहते आहेत, आज मोदींच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया मोदींच्या जिवनातील काही किस्से, सवयी, आणि एका सामान्य व्यक्तीपासून पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास...
लहानपणी शेतात जाऊन खायचे आंबे...
लहानपणी मोदींच्या घरची परिस्थिती चांगली नसल्यानं आंबे विकत घ्यायला जमत नव्हतं. त्यामुळे शेतांमध्ये जाऊन झाडावर पिकलेले आंबे खायला मोदींना आवडायचं. त्यावेळी आंबा धुवून खावा, तो कसा आहे, हे न पाहता आंबा खायला मजा यायची, असं मोदींनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
सर्वसामान्य कुटुंबातून असल्यामुळं बाहेरंच जग पाहिल नव्हत..
एखादी साधारण नोकरी लागली तरी आई शेजारच्या लोकांना गुळ वाटायची. सर्वसमान्य कुटुंबातून असल्यामुळ बाहेरचं जग पाहिलं नव्हत. मात्र, पुढे जबाबदाऱ्या येत गेल्या आणि प्रगती करत गेलो. हा प्रवास खुप अनैसर्गिक आहे.
संन्यासी किंवा सैनिक बनायची इच्छा होती...
लहानपणी पुस्तकं वाचायची आवड होती. १९६२ च्या युद्धावेळी गुजरातमधील सैनिक रेल्वेने जायचे तेव्हा त्यांचा खूप सन्मान आणि सत्कार केला जायचा. त्यामुळे लष्करात जायची इच्छा निर्माण झाली. विशीमध्ये हिमालयामध्ये भटकले. अनेक प्रश्न पडायचे उत्तर शोधायचो. भटकत भटकत इथपर्यंत येऊन पोहचलो.
कोणावर कामाचा दबाव टाकत नाही, माझ काम पाहून अधिकारी आपोआप काम करतात..
काम करत असताना मी कोणावरही दबाव टाकत नाही, माझी कामाप्रती असलेली निष्ठा पाहून अधिकारी आपोओआपच काम करतात. मी कोणाकडून मजदुरी करुन घेत नाही, स्वत: आधी काम करतो, मग बाकी लोक कामाची प्रेरणा घेतात, त्यामुळे टीम वर्कने काम करुन घ्यायची सवय आहे. मिटींगमध्ये मोबाईल फोन वापरत नाही, मीच शिस्त पाळत असल्यामुळं बाकीचे अधिकारी फोन वापरत नाहीत.
पंतप्रधान मोदी फक्त ३ तासांची झोप घेतात, ओबामांनीही सांगितल झोप वाढवा
शरीराला कमी झोपेची सवय लागली आहे. ३ ते ४ तासांतच झोप पूर्ण होते. झोपेतून उठल्यावर क्षणार्धात आळस झटकतो. ओबामांनीही सांगितलं झोप वाढवा, असं मोदी एका मुलाखतीमध्ये म्हणाले.