लखनऊ - उत्तरप्रदेशच्या हरदोई जिल्ह्यातील गांधी भवनमध्ये होणारे 'गांधी भजन' हे संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. गेल्या सहा वर्षांपासून, रोज संध्याकाळी साडेपाच वाजता या गांधी भजनाचे आयोजन होते. वेगवेगळ्या जातीधर्मांचे गांधीवादी लोक इथे संध्याकाळी एकत्र जमतात आणि गांधीजींनी लिहिलेली गाणी गातात. तसेच सर्वधर्म समभावाचा संदेश देत, इथे सर्व धर्मांमधील शिकवणीही सांगितल्या जातात.
देशातील एकमेव गांधी भवन, जिथे रोज आयोजित होते 'गांधी भजन'...
उत्तर प्रदेशातील हरदोई येथील गांधी भवन हे देशातील एकमेव असे गांधी भवन आहे, ज्या ठिकाणी आजही दररोज गांधी भजनाचे आयोजन केले जाते. जाणून घेऊया या गांधी भवनाची रंजक कथा...
लखनऊ - उत्तरप्रदेशच्या हरदोई जिल्ह्यातील गांधी भवनमध्ये होणारे 'गांधी भजन' हे संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. गेल्या सहा वर्षांपासून, रोज संध्याकाळी साडेपाच वाजता या गांधी भजनाचे आयोजन होते. वेगवेगळ्या जातीधर्मांचे गांधीवादी लोक इथे संध्याकाळी एकत्र जमतात आणि गांधीजींनी लिहिलेली गाणी गातात. तसेच सर्वधर्म समभावाचा संदेश देत, इथे सर्व धर्मांमधील शिकवणीही सांगितल्या जातात.
देशातील एकमेव गांधी भवन, जिथे रोज आयोजित होते 'गांधी भजन'...
उत्तर प्रदेशातील हरदोई येथील गांधी भवन हे देशातील एकमेव असे गांधी भवन आहे जिथे आजही दररोज गांधी भजनाचे आयोजन केले जाते. जाणून घेऊया या गांधी भवनाची रंजक कथा...
लखनऊ - उत्तरप्रदेशच्या हरदोई जिल्ह्यातील गांधी भवनमध्ये होणारे 'गांधी भजन' हे संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. गेल्या सहा वर्षांपासून, रोज संध्याकाळी साडेपाच वाजता या गांधी भजनाचे आयोजन होतं आहे. वेगवेगळ्या जातीधर्मांचे गांधीवादी लोक इथे संध्याकाळी एकत्र जमतात आणि गांधीजींनी लिहिलेली गाणी गातात. तसेच सर्वधर्म समभावाचा संदेश देत, इथे सर्व धर्मांमधील शिकवणीही सांगितल्या जातात.
माजी शहर दंडाधिकारी अशोक कुमार शुक्ल यांच्या सल्ल्यानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी हा उपक्रम सुरु केला गेला.
११ ऑक्टोबर १९२९ला गांधीजींनी येथे एक सभा घेतली होती. या सभेला उपस्थित महिलांनी प्रेरित होऊन आपले दागिने स्वातंत्र्य चळवळीकरता दान केले होते. त्यानंतर, येथे विदेशी कपड्यांची होळीदेखील करण्यात आली होती. स्वातंत्र्यापूर्वी या जागेला 'व्हिक्टोरिया हॉल ट्रस्ट' असे म्हणत. मात्र, स्वातंत्र्यानंतर गांधीजींच्या स्मरणार्थ इथे गांधी भवन उभारण्याची मागणी लोकांनी केली.
या मागणीला सरकारकडून काहीच प्रतिसाद नाही मिळाला. त्यामुळे गांधीवादी लोकांनी स्वतःच साडेपाच लाख रुपये गोळा करून 'गांधी भवन'ची स्थापना केली. स्वातंत्र्यसेनानी रघुनंदन शर्मा आणि जयदेव कपूर यांच्या उपस्थितीत, ८ मे १९८३ रोजी या 'गांधी भवन'चे अनावरण झाले.
या भवनाच्या भिंती, गांधीजींच्या आठवणींनी सजवल्या आहेत. इथे असलेला गांधीजींचा चरखा, या भवनाच्या सौंदर्यात आणखी भर घालतो. सध्याचे शहर दंडाधिकारी पुलकीत खरे यांच्या प्रयत्नाने, या भवनातील प्रार्थना सभागृहाला सुशोभित करण्यात आले आहे.
देशातील हे एकमेव 'गांधी भवन' आहे, जिथे दररोज 'गांधी भजन' आयोजित केले जाते.
Conclusion: