जयपूर - एखादी गोष्ट मिळाली नाही तर आज अनेक जण निराश होतात, हतबल होतात. काही जण तर टोकाचे पाऊल उचलून आपले आयुष्य संपवतात. मात्र, एक 23 वर्षींय तरुणी दोन्ही हात नसल्यामुळे हाताच्या कोपराने चित्रं काढते. जयपूरमधील साहित्य महोत्सवात तीला चित्र काढताना पाहून सर्व जण हैरान झाली.
मोहिनी असे त्या तरुणीचे नाव असून ती महाराष्ट्रातील नागपूर येथील रहिवासी आहे. जयपूरमधील साहित्य महोत्सवात तिने सलग 5 दिवस आपल्या हाताच्या कोपराने चित्रे रेखाटली. तिला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. मात्र, मोहिनीने एका रेल्वे अपघातात दोन्ही हात कोपरापासून गमावले. त्यानंतरही तिने धैर्य गमावले नाही आणि चित्रकलेची आवड कायम ठेवली. मोहिनीने बीटेक मध्ये शिक्षण घेतले असून आयएएस होण्याचे तिचे स्वप्न आहे.