बेलारी - कर्नाटकमधील उत्तर-पश्चिम भागामध्ये पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील बेलारी तालुक्यातील जागतिक वारसा स्थळ हम्पीलाही पुराचा फटका बसला आहे. राज्य शासनाने एका जलाशयातून 1.70 लाख पाण्याचा विसर्ग केल्यामुळे हम्पी पाण्यात बुडाले आहे.
तुंगभद्रा नदीकाठारील रहिवाशांना सुरक्षित जागी हलवण्यात आले आहे. राज्यातील पश्चिम भागातील जलाशय भरल्यामुळे तुंगभद्रा धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे कांपली किल्ल्याच्या समोरील आंजनेय मंदिर थोडे पाण्याखाली गेले आहे. धरण भरल्यामुळे पाण्याचा आणखी विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पर्यटकांना हम्पी सोडण्यास सांगितले आहे. याचबरोबर बेल्लारी आणि कोप्पालक जिल्ह्यातील नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी पोहचवण्यात येत आहे.
कर्नाटकमध्येही पावसाने दाणादाण उडवली असून बऱ्याच भागात पूरस्थिती निर्माण झालेली आहे. सध्याची स्थिती गेल्या 45 वर्षातील ही राज्यातील सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी म्हटले आहे.
हम्पी हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्यातले एक गाव आहे. हे गाव तुंगभद्रा नदीकाठी वसले आहे. हे गाव प्राचीन हिंदू विजयनगर साम्राज्याचे राजधानीचे नगर होते. हम्पी येथील श्री विरुपाक्ष मंदिर हे प्रसिद्ध आहे. युनेस्कोद्वारे हम्पी या गावाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. हम्पी हे एक जागतिक वारसा स्थळ आहे.