ETV Bharat / bharat

जपानमध्ये हाजिबीस टायफूनच्या तडाख्यात २५ मृत्युमुखी; मोदींकडून शोक व्यक्त - pm narendra modi condolence

टायफून सोबतच येथील लोकांना पूर आणि भूस्खलनाच्या संकटालाही सामोरे जावे आहे. अनेक नद्यांचे पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरले आहे. देशातील मध्य, पूर्वेकडील आणि ईशान्येकडील प्रांतांमध्ये बचावकार्य सुरू आहे. जपानच्या मुख्य होंशू या बेटावरील ६ दशलक्ष लोकांना हा प्रदेश सोडण्यास सांगण्यात आले आहे.

मोदींनी केला शोक व्यक्त
author img

By

Published : Oct 13, 2019, 6:23 PM IST

नवी दिल्ली - जपानमध्ये हाजिबीस टायफून वादळाने थैमान घातले आहे. येथे मृतांचा आकडा २५ वर पोहोचला आहे, अशी माहिती स्थानिक वृत्तसंस्थेने दिली आहे. या दु:खद घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी शोक व्यक्त केला आहे. तसेच, त्यांनी जपानी यंत्रणांनी नैसर्गिक आपत्तीविरोधात तत्परतेने बचावकार्य राबविल्याबद्दल त्यांनी प्रशंसाही केली आहे.

'जपानमध्ये टायफूनच्या थैमानामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. मी सर्व भारतीयांच्या वतीने त्यांच्यासाठी दुःख व्यक्त करतो. तसेच, सर्व काही लवकरात लवकर सुरळीत व्हावे, अशी इच्छाही व्यक्त करतो. मला जपानी लोकांच्या आपत्तीशी लढण्याच्या तयारीविषयी आणि मनोभूमिकेविषयी खात्री वाटते. माझे मित्र जपानी पंतप्रधान शिंजो अॅबे यातून मार्ग काढण्यास सक्षम आहेत. तसेच, येथील यंत्रणांनी नैसर्गिक आपत्तीविरोधात तत्परतेने बचावकार्य राबविल्याबद्दल कौतुक आहे.'

टायफून सोबतच येथील लोकांना पूर आणि भूस्खलनाच्या संकटालाही सामोरे जावे आहे. अनेक नद्यांचे पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरले आहे. देशातील मध्य, पूर्वेकडील आणि ईशान्येकडील प्रांतांमध्ये बचावकार्य सुरू आहे. जपानच्या मुख्य होंशू या बेटावरील ६ दशलक्ष लोकांना हा प्रदेश सोडण्यास सांगण्यात आले आहे.

हाजिबीस टायफूनचे संकट 'आ' वासून उभे असतानाच आज सकाळी जपान ५.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने हादरले. या भूकंपाचे केंद्र चिबा-केन प्रदेशात जमिनीखाली ८० किलोमीटरवर होते. जपानच्या हवामान खात्याने इबाराकी, तोचिगी, फुकुशिमा, मियागी आणि नियगाता हा प्रांतांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याने सावधगिरीचा इशारा दिला होता.

Intro:Body:

----------------

जपानमध्ये हाजिबीस टायफूनच्या तडाख्यात २५ मुत्युमुखी; पंतप्रधान मोदींनी केला शोक व्यक्त

नवी दिल्ली - जपानमध्ये हाजिबीस टायफून वादळाने थैमान घातले आहे. येथे मृतांचा आकडा २५ वर पोहोचला आहे, अशी माहिती स्थानिक वृत्तसंस्थेने दिली आहे. या दु:खद घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी शोक व्यक्त केला आहे. तसेच, त्यांनी जपानी यंत्रणांनी नैसर्गिक आपत्तीविरोधात तत्परतेने बचावकार्य राबविल्याबद्दल त्यांनी प्रशंसाही केली आहे.

'जपानमध्ये टायफूनच्या थैमानामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. मी सर्व भारतीयांच्या वतीने त्यांच्यासाठी दुःख व्यक्त करतो. तसेच, सर्व काही लवकरात लवकर सुरळीत व्हावे, अशी इच्छाही व्यक्त करतो. मला जपानी लोकांच्या आपत्तीशी लढण्याच्या तयारीविषयी आणि मनोभूमिकेविषयी खात्री वाटते. माझे मित्र जपानी पंतप्रधान शिंजो अॅबे यातून मार्ग काढण्यास सक्षम आहेत. तसेच, येथील यंत्रणांनी नैसर्गिक आपत्तीविरोधात तत्परतेने बचावकार्य राबविल्याबद्दल कौतुक आहे.'

टायफून सोबतच येथील लोकांना पूर आणि भूस्खलनाच्या संकटालाही सामोरे जावे आहे. अनेक नद्यांचे पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरले आहे. देशातील मध्य, पूर्वेकडील आणि ईशान्येकडील प्रांतांमध्ये बचावकार्य सुरू आहे. जपानच्या मुख्य होंशू या बेटावरील ६ दशलक्ष लोकांना हा प्रदेश सोडण्यास सांगण्यात आले आहे.

हाजिबीस टायफूनचे संकट आ वासून उभे असतानाच आज सकाळी जपान ५.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने हादरले. या भूकंपाचे केंद्र चिबा-केन प्रदेशात जमिखाली ८० किलोमीटरवर होते. जपानच्या हवामान खात्याने इबाराकी, तोचिगी, फुकुशिमा, मियागी आणि नियगाता हा प्रांतांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याने सावधगिरीचा इशारा दिला होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.