नवी दिल्ली - ईशान्य दिल्लीमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी चिंता व्यक्त केली. 'सरकारचे या घटनांकडे दुर्लक्ष करणे दुर्दैवी आहे. खर तर हा हिंसाचार काही तासांमध्ये नियंत्रित व्हायला हवा होता. मात्र दोन दिवस-रात्र उलटून गेल्यानंतरही हे वाढतच चालले आहे' अशी टीका त्यांनी सरकारवर केली.
हेही वाचा - हिंसाचारादरम्यान लुटले दारूचे दुकान; दिल्लीच्या चाँद बाग परिसरातील घटना
पोलीस कर्मचाऱ्याची कमतरता असल्यास ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अन्य दलांचा वापर करता येईल. पण जर पुरेसे पोलीस दल उपलब्ध असतानाही हिंसाचार होत असेल, तर मग पोलीस त्यांच्या अधिकारांचा वापर करत नाहीत, असा आरोप आझाद यांनी केला. केंद्र सरकार, गृह मंत्रालय आणि दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी ही परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात आणावी, अशी अपीलही त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा - 'कुठेही लपा.. घुसून मारू', दहशतवाद्यांना हा संदेश देण्यासाठीच बालाकोट एअर स्ट्राईक'
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून दिल्लीत गेल्या ३ दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. यात आतापर्यंत १८ जणांचा मृत्य झाला, तर जवळपास दीडशेच्यावर लोक जखमी झाले आहे.