नवी दिल्ली - प्रदूषणामुळे हवेचा स्तर खालावला असून नागरिकांना घराच्या बाहेर पडणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील मंत्री सुनील भराला यांनी अजब सल्ला दिला आहे.
-
#WATCH Uttar Pradesh minister Sunil Bharala: Farmers have always practiced stubble burning, it's a natural system. Repeated criticism of it is unfortunate. Govts should hold 'Yagya' to please Lord Indra (God of rain), as done traditionally. He (Lord Indra) will set things right. pic.twitter.com/EcImGAbVrl
— ANI UP (@ANINewsUP) November 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Uttar Pradesh minister Sunil Bharala: Farmers have always practiced stubble burning, it's a natural system. Repeated criticism of it is unfortunate. Govts should hold 'Yagya' to please Lord Indra (God of rain), as done traditionally. He (Lord Indra) will set things right. pic.twitter.com/EcImGAbVrl
— ANI UP (@ANINewsUP) November 3, 2019#WATCH Uttar Pradesh minister Sunil Bharala: Farmers have always practiced stubble burning, it's a natural system. Repeated criticism of it is unfortunate. Govts should hold 'Yagya' to please Lord Indra (God of rain), as done traditionally. He (Lord Indra) will set things right. pic.twitter.com/EcImGAbVrl
— ANI UP (@ANINewsUP) November 3, 2019
शेतकरी पिकांचा टाकाऊ भाग पेटवून देत आहेत. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे, असे म्हटल्या जात आहे. मात्र शेतकरी पहिल्यापासून पराळी (पिकांचा टाकाऊ भाग पेटवून देणे) पेटवतात. या मुद्दयावर लक्ष देण्यापेक्षा आपल्या जुन्या परंपरा म्हणजेच पावसासाठी इंद्रदेवाला खूश केले जायचं हे ध्यानात घ्यावे. त्यामुळे आता यज्ञ करुन इंद्रदेवाला खूश करा ते सगळं काही ठीक करतील, ही माझी सरकारला विनंती आहे, असे मंत्री सुनील भराला यांनी म्हटले आहे.
राजधानी क्षेत्रालगतच्या हरियाणा, उत्तर प्रदेश राज्यामध्ये शेतकरी पिकांचा टाकाऊ भाग पेटवून देत आहेत. त्यामुळे देखील प्रदूषणात भर पडली. खराब हवेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून आरोग्य आणिबाणी आली आहे. त्यामुळे देखील प्रदूषणात भर पडली. शेतकऱ्यांनी शेतामध्ये आगी लावू नये म्हणून प्रशासनाने कडक कारवाई करण्यासंबधीचे आदेश दिले आहेत.