नवी दिल्ली - मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकार विविध सुधारणा जाहीर करणार आहे. उत्पादनक्षम असलेल्या क्षेत्रांना पुरेसा वित्तपुरवठा आणि व्यापक विकासाला चालना मिळण्यासाठी सरकार हे पाऊल उचलणार आहे.
केंद्र सरकार जीएसटीमध्ये कपात करणार नाही. कारण यापूर्वीच्या तुलनेच जीएसटी कमी असल्याचे सरकारची भूमिका आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध उद्योगांच्या संघटना, बँकेचे वरिष्ठ अधिकारी, विदेशातील आणि देशातील गुंतवणुकदारांची बैठक घेतली होती. तसेच विविध क्षेत्रातील लोकांच्या बैठकी घेवून त्यांचे प्रश्न आणि मागण्या जाणून घेतल्या होत्या.
सूत्राच्या माहितीनुसार विविध उद्योगाकडून ज्या मुद्द्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहेत. ते प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे सूत्राने सांगितले. पुरेसा वित्तपुरवठा, कमी व्याजदर आणि धोरणातील सुटसुटीतपणा उद्योगांना अपेक्षित आहे. केंद्र सरकारने चालू वर्षात ७ टक्के जीडीपी गाठण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मंदावलेली अर्थव्यवस्था असताना हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकारला कसरत करावी लागत आहे.