ETV Bharat / bharat

गोवा : राज्यातील सखल भागात शिरलेल्या पाण्याचा आढावा घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना - instructions

गेल्या पाच दिवसांहून अधिक काळ गोव्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. तेरेखोल, साळ, शापोरा, कुशावती, म्हादई, वेळूस, वाळवंटी, जुआरी नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत. काही गावांचा मुख्य रस्त्यापासूनच संपर्क तुटला आहे. सोमवारी डिचोली तालुक्यातील पिळगावमधील नदीलगतच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर राजधानी पणजीतील मळा भागातील काही घरे पाण्याखाली आहेत.

गोवा : राज्यातील सखल भागांत शिरलेल्या पाण्याचा आढावा घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
author img

By

Published : Aug 6, 2019, 3:53 PM IST

पणजी - तीन दिवसांहून अधिक काळ सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राज्यातील सखल भागांत पुराचे पाणी शिरले आहे. काही ठिकाणी पडझड झालेली आहे. यावर आपत्कालीन यंत्रणा सतर्क आहे. आज दिवसभर संततधार कायम राहिल्यास बुधवारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी द्यावी, अशी सूचना उच्च शिक्षण संचालनालयाला देण्यात आली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत प्रवेश करण्यापूर्वी दिली.

गेल्या पाच दिवसांहून अधिक काळ गोव्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. तेरेखोल, साळ, शापोरा, कुशावती, म्हादई, वेळूस, वाळवंटी, जुआरी नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत. काही गावांचा मुख्य रस्त्यापासूनच संपर्क तुटला आहे. सोमवारी डिचोली तालुक्यातील पिळगावमधील नदीलगतच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर राजधानी पणजीतील मळा भागातील काही घरे पाण्याखाली आहेत.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सोमवारी रात्री उशिरा आमोणा , साखळी भागातील पुराची पाहणी केली. तर आज सकाळी पणजी-मळा भागाला भेट देत पूर परिस्थितीचा आढावा घेत. संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले, सोमवारी आमोणा भागातील पुराची पाहणी केली आहे. तसेच आज सकाळी पणजी-मळा भागाची पाहणी केली असता 25 घरांत पुराचे पाणी शिरले आहे. हे पाणी बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ज्या दुकानात पाणी शिरले त्यांना मदत करत सामान हलविण्यास सांगितले आहे. तसेच आज दिवसभर पाऊस असाच राहिला तर उच्च शिक्षण संचालनालयाच्या संचालकांना सूचना दिल्या आहेत की, आवश्यकता वाटल्यास बुधवारी राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी द्यावी. राज्यातील सर्व धरणांची पाणी पातळी योग्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

Intro:पणजी : तीन दिवसांहून अधिक काळ सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राज्यातील सखल भागात पुराचे पाणी शिरले आहे. काही ठिकाणी पडझड झालेली आहे. यावर आपत्कालीन यंत्रणा सतर्क आहे. आज दिवसभर जर संततधार कायम राहिल्यास बुधवारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय उच्च शिक्षण संचालनालयाला सूचना दिल्या आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत प्रवेश करण्यापूर्वी दिली.

Body:मागील पाच दिवसांहून अधिक काळ गोव्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. तेरेखोल, साळ, शापोरा, कुशावती, म्हादई, वेळूस, वाळवंटी, जूआरी नद्यांना पूर आलेला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत. काही गावांचा मुख्य रस्त्यापासूनच संपर्क तुटलेला आहे. सोमवारी डिचोली तालुक्यातील पिळगावमधील नदी लगतच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर राजधानी पणजीतील मळा भागातील काही घरे पाण्याखाली आहेत.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सोमवारी रात्री उशिरा आमोणा , साखळी भागातील पुराची पाहणी केली. तर आज सकाळी पणजी-मळा भागाला भेट देत पुर परिस्थितीचा आढावा घेत. संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले, सोमवारी आमोणा भागातील पुराची पाहणी केली आहे. तसेच आज सकाळी पणजी-मळा भागाची पाहणी केली असता 25 घरांत पुराचे पाणी शिरले आहे. हे पाणी बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर ज्या दुकानात पाणी शिरले त्यांना मदत करत सामान हलविण्यास सांगितले आहे. तसेच आज दिवसभर पाऊस असाच राहिला तर उच्च शिक्षण संचालनालयाच्या संचालकांना सूचना दिल्या आहेत की, आवश्यकता वाटल्यास बुधवारी राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी द्यावी.
दरम्यान, राज्यातील सर्व धरणांची पाणी पातळी योग्य आहे, असेल त्यांनी सांगितले.
....
फोटो : cm pramod sawant 6819 नावाने ईमेल

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.