पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सप्टेंबर अखेर सरकारच्या विविध खात्यांच्या खर्चाचा आढावा घेतला. हा एकुण खर्च सहा हजार सहाशे बारा रुपये असून त्याचे सर्वसाधारण प्रमाण 32 टक्के आहे. त्यापैकी महसूली खर्च 38 टक्के तर भांडवली खर्च 20 टक्के आहे.
हेही वाचा - मी म्हातारा झालो असेल तर घरी नातू-पणतू सांभाळेन, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया
राज्यातील वाढती बेरोजगारी आणि जाहिरात देऊनही न करण्यात आलेली नोकरभरती यामुळे विरोधी पक्षांकडून गोवा सरकार आर्थिक स्थितीच्या मुद्द्यावर सातत्याने लक्ष केले जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आजच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या 48 खात्यांचा एकत्रित खर्च 86 टक्के असल्याचे नमूद केले. शिवाय या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना खर्चाचा नियमित आढावा घेण्याची सूचनाही केली आहे. तसेच खाते प्रमुखांनी केंद्राकडून येणाऱ्या निधीखर्च आढावाही नियमित सादर करण्यासही सांगितले आहे.
दरम्यान, संध्याकाळी मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि पणजी मतदारसंघाचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी पणजी-मळा भागातील पुरग्रस्तांना धनादेशांचे वाटप केले. पावसाळ्यात झालेल्या नुकसानभरपाई पोटी ही रक्कम देण्यात आली आहे.