ETV Bharat / bharat

काश्मीरचे माजी उपराज्यपाल मुर्मू यांची 'कॅग'च्या प्रमुखपदी नियुक्ती

मुर्मू हे 1985 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. बुधवारी त्यांनी काश्मीरच्या उपराज्यपाल पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. आता त्यांची नियुक्ती भारताचे नियंत्रक महालेखापरीक्षक(कॅग) पदी करण्यात आली आहे.

author img

By

Published : Aug 8, 2020, 1:03 PM IST

गिरिष चंद्र मुर्मू
गिरिष चंद्र मुर्मू

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरचे माजी उपराज्यपाल गिरिष चंद्र मुर्मू यांनी भारताचे नियंत्रक महालेखापरीक्षक(कॅग) या पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुर्मू यांना पदाच्या गोपनियतेची शपथ दिली.

मुर्मू हे 1985 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. बुधवारी त्यांनी तडकाफडकी उपराज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे काश्मीरची स्वायत्तता रद्द करण्याच्या घटनेला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्याच दिवशी मुर्मू यांनी राजीनामा सोपवला. 60 वर्षीय मुर्मू हे गुजरात केडरचे अधिकारी आहेत. मागील वर्षी 29 ऑक्टोबरला त्यांनी जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या उपराज्यपाल पदाची शपथ घेतली होती.

काश्मीरचे उपराज्यपाल म्हणून नेमणूक होण्याआधी मुर्मू अर्थ मंत्रालयात खर्च विभागात सचिव होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मुर्मू यांनी त्यांचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. कॅगच्या पदावर सहा वर्षांसाठी नेमणूक करण्यात येते. वयाची 65 वर्ष किंवा सहा वर्षांचा कार्यकाळ जो आधी होईल, तेवढा काळ कॅगच्या पदावर राहता येते. कॅग घटनात्मक पद असून केंद्र आणि राज्य सरकारचे लेखा तपासण्याचे महत्त्वाचे काम त्यांच्याकडे असते. त्यांचा अहवाल संसदेपुढे ठेवण्यात येतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.